Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Konkan › नॅशनल मेडिकल कमिशनविरोधात डॉक्टर रस्त्यावर

नॅशनल मेडिकल कमिशनविरोधात डॉक्टर रस्त्यावर

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:19PMकुडाळ : शहर वार्ताहर

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक (नॅशनल मेडिकल कमिशन) ला विरोध दर्शविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्गच्या डॉक्टरांनी रविवारी रस्त्यावर उतरत कुडाळात जिल्हास्तरीय सायकल रॅली काढली. दरम्यान खा. विनायक राऊत यांचे असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यावर खा.राऊत यांनी याबाबत संसदेत आवाज उठवून डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही राहू ,असे आश्‍वासन दिले.

शासनाने ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार न करता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक आणू घातले आहे. हे सर्वसामान्य व डॉक्टर्सना हानीकारक आहे. या विधेयकामुळे सध्या ग्रामीण भागातील जनता ज्या डॉक्टर्सकडे सेवा घेते, त्या महाग होतील तसेच बंद होतील, अशी भीती व्यक्त करीत सिंधुदुर्गातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी सायकल रॅली काढून विधेयकाचा निषेध 
केला.

या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी खा. विनायक राऊत, जि.प.सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, संदेश शिरसाट उपस्थित होते. रॅलीत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश्‍वर उबाळे, सचिव डॉ.संजय केसरे, डॉ.नितीन शेटये, डॉ.अजित नेरूरकर, डॉ.संजय निगुडकर, डॉ.जयेंद्र परूळेकर, डॉ.जयसिंह रावराणे, डॉ.संजीव आकेरकर, डॉ.राजेश नवांगूळ, डॉ.योगेश नवांगूळ, डॉ.विवेक पाटणकर, डॉ.जी.टी.राणे, डॉ.प्रवीण बिरमोळे, डॉ. सुधीर रेडकर, डॉ. धीरज सावंत, डॉ. अमुल पावसकर, डॉ. शंतनू तेंडोलकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. संजय सावंत, डॉ. मकरंद परूळेकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ. गौरी परूळेकर, डॉ. श्रृती सावंत, डॉ. जयश्री केसरे, डॉ. अश्‍विनी खानोलकर, डॉ. शुशांता कुलकर्णी, डॉ. संजना देसकर, डॉ. विशाखा पाटील, गजानन कांदळगांवकर, राजू केसरकर आदींसह जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग घेतला.

रॅलीदरम्यान ठिकठिकाणी डॉक्टरांची भाषणे झाली. तसेच नागरिकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. सामान्य जनतेनेही विधेयका विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या अशी माहिती असोसिएशनचे सचिव डॉ. संजय केसरे यांनी दिली.

25 रोजी दिल्लीत महापंचायत 

या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी दिल्ली येथे 25 मार्च रोजी महापंचायत होणार असून देशभरातील सुमारे 3 लाख डॉक्टर्स उपस्थित राहून निषेध नोंदविणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सचिव डॉ. संजय केसरे यांनी दिली.