Wed, May 22, 2019 16:43होमपेज › Konkan › कमिशन विधेयकाचा सिंधुदुर्गात निषेध

कमिशन विधेयकाचा सिंधुदुर्गात निषेध

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:29PMकुडाळ : शहर वार्ताहर

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. या विधेयकाचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी जिल्ह्यात कामबंद आंदोलन छेडले. यात जिल्ह्यातील 90 खासगी रूग्णालये व 250 डॉक्टरांनी सहभाग घेतला, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे, सचिव डॉ. अमोघ चुबे यांनी दिली. या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू होती असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा पुर्वीपासूनच विरोध आहे. हे विधेयक डॉक्टरांप्रमाणेच रूग्णांवर अन्याय करणारे आहे. लोकसभेत सादर करण्यात येणार्‍या या विधेयकाला असोसिएशनचा तीव्र विरोध आहे. या विधेयकाचा निषेध म्हणून शनिवारी जिल्ह्यातील डॉक्टरांनी आपला व्यवसाय बंद ठेवला. सकाळी 6 ते सायं 6 यावेळेत हे कामबंद आंदोलन छेडण्यात आले. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होती. नवीन कायदा झाल्यास आरोग्य सेवा कार्पोरेट व्यवसाय बनेल. सर्वसामान्यांना परवडणार नाही असे डॉ. केसरे व डॉ. चुबे यांनी सांगितले.