Fri, Jul 19, 2019 00:50होमपेज › Konkan › कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर

कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:36PMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेतीन फुटांवरून पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले आहेत. धरणातून कोयना नदीत प्रतिसेकंद 24 हजार 246 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.