Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Konkan › कोरेगाव भीमा दंगलीत भाजपचा हात : राष्ट्रवादी काँग्रेस

कोरेगाव भीमा दंगलीत भाजपचा हात : राष्ट्रवादी काँग्रेस

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 7:28PM

बुकमार्क करा
कर्जत : प्रतिनीधी 

कोरेगाव भीमा येथील दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा खळबळ जनक आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. ते कर्जत येथील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.

आज कर्जत येथिल भाग्यतारा मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी दादाभाऊ कळकमर, जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, आविनाश आदिक, राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, उमेश परहर, गुलाब तनपुरे, काकासाहेब तापकीर, विजय मोडळे, बाळसाहेब शिंदे, नितीन धांडे, शहाजी भोसले, वंसत कांबळे, रघूनाथ काळदाते, साधना कदम, सोनाली बोराटे, हेंमत मोरे, बाळासाहेब सपकाळ, स्वप्नील तनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार हे समाजामध्ये फुट पाडण्याचे काम करीत आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेमध्ये भाजपचा हात आहे. मी कोरेगाव भीमा, सनसवाडी, वढूज या गावाना भेट दिली आहे. येथील संरपच दलित आहे. कोणीतरी बाहेरील २५ ते ३० युवक येथे आले व त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमध्ये भाजपासाठी काम करणार्‍या हिदुंत्ववादी संघटनाचा यामध्ये सहभाग आहे. मनुवादी विचार आता राज्यात प्रभावी ठरत आहेत. तसे झाल्यास बहुजन समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. राज्यात पुरोगामी विचारांसाठी आयुष्य वेचले असे शाहू महाराज, यशंवतराव चव्हाण, शरद पवार आणि इतरानी आपले आयुष्य वेचले ते सर्व वाया जाणार आहे काय असा सवालही उपस्‍थित केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी समविचारी पक्ष एकत्र

यावेळी बोलताना दिलीप वळसे पुढे म्हणाले की, गुजरात निवडणुकीमध्ये भाजपचे पंतप्रधान व भाजप यांची अवस्था फार वाईट झाली आहे. देशात व राज्यामध्ये  भाजप आणि शिवसनेच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. अगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका केव्हाही घोषीत होऊ शकतात. यामुळे या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी व समविचारी पक्ष एकत्र येणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यानी आगामी काळात प्रामाणिकपणे काम करावे असेही मत व्‍यक्‍त केले.

नगरदक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे राहणार

जरी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तरीही नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. मात्र अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार आहेत. इतर पक्षाला जागा दिली तरीही आपण सर्वानी काम करण्याची तयारी ठेवावी. 

कर्जत मेळावा: शरद पवार, अजित पवार यांची उपस्‍थिती

कर्जत, जामखेड आणि श्रीगांदे तालुक्यातील एकत्र मेळावा कर्जत येथे शरद पवार आणि आजित पवार यांचे उपस्थितीमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तेव्‍हा कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

रस्त्यावर उतरून पालकमंत्री यांना जाब विचारा

या मेळाव्‍यात कोपर्डीपासून नागपूरपर्यंत महिला असुरक्षित नाहीत. खून, दरोडे, बलत्कार घटना घडत आहे. युवक बेरोजगार झाला आहे. शेतकर्‍यांची आवस्‍था बिकट आहे. अश्वासनांची खैरात होत आहे. राज्यात दिवाळीखोरीत गेले आहे. यामुळे नागरिकांनी रस्‍त्यावर उत्तरून पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी केले.

हे सरकार सगळ्यात अपयशी ठरले आहे. यामुळे आमदार आणि मंत्र्यांना जबाबदार धरून आंदोलन छेडण्याचा काळ असल्याची भावना जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी व्‍यक्‍त केल्या. आविनाश आदिक म्हणाले की, देशात व राज्यात जनतेने विकास आणि भ्रष्टाचारा या मुद्यावर सत्ता परिवर्तन केले मात्र, आज विकास गायब आहे आणि भष्टाचार सुरू आहे. 

कोटीच्या उड्डाणाचा कंटाळा आला 

 पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर राजेंद्र फाळके  यांनी प्रखर टीका केली. यावेळी काही नेत्यांनी स्थानीक गटबाजी ,पालकमंत्री यांच्यासोबत मैत्री या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी मंजुषा गुंड, बाळासाहेब शिंदे, विजय मोडळे, दत्तात्रय पोटी यांची भाषणे झाली.