Sat, Aug 24, 2019 00:19



होमपेज › Konkan › ‘कोरे’तील निम्म्याहून  अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त

‘कोरे’तील निम्म्याहून  अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वेत नोकरी मिळवताना प्रकल्पग्रस्तावर अन्याय केला जातो. प्रकल्पग्रस्तांना डावलून परराज्यातील उमेदवारांना नोकरी देण्यात येते, अशी नेहमीच ओरड होते. मात्र,  प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नसून कोकण रेल्वेतील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त असल्याची माहिती,  ‘कोरे’चे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्या सोबत कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडे उपस्थित होते.  तेलंग पुढे म्हणाले की, ऑक्टोबर 1990 साली कोकण रेल्वेच्या कामाला प्रारंभ झाला. 
या मार्गावर 26 जानेवारी 1998 रोजी पहिली गाडी धावली.