Fri, Feb 22, 2019 11:33होमपेज › Konkan › कोकणातील खेळाडूंनी करिअर घडवावे

कोकणातील खेळाडूंनी करिअर घडवावे

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 02 2018 9:31PMसावर्डे : वार्ताहर 

ब्राझीलसारखे क्रीडा संकुल डेरवण येथे खेळाडूंना उपलब्ध झाले आहे. कोकणातील खेळाडूंनी आपले करिअर घडवावे, असे प्रतिपादन खेळाडू ललिता बाबर यांनी केले.डेरवण येथील विठ्ठलराव जोशी क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय युथ गेम्स स्पर्धा सुरू आहे. तिचे उद्घाटन रिओ ऑलिम्पिक सहभागी खेळाडू ललिता बाबर व श्रीरंग इनामदार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बाबर बोलत होत्या.

आर्या सिनकर व ईशा पवार यांनी क्रीडा ज्योत आणली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अशोक जोशी, क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित, डॉ. सुवर्णा पाटील, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, शरयू यशवंतराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी झालेल्या 100 मी. धावणे स्पर्धेत आर्या सिनकर हिने सुवर्णपदक मिळवले. 16 वर्षांखालील कोल्हापूरचा विवेक मोरे याने 3 हजार मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले. सातार्‍याचे  सुशांत जेधे, बाळू पोकळे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. 1500 मीटर धावणेमध्ये विवेक मोरे - सुवर्ण, सुशांत जेधे- रौप्यपदक. याच गटात मुलींमध्ये अस्मिता कांबळे -कोल्हापूर-सुवर्णपदक, प्रतीक्षा मांढरे-रौप्यपदक पटकावले.

300 मी. धावणे स्पर्धेत 18 वर्षांखालील मुली : कोल्हापूरची अस्मिता कांबळे-सुवर्णपदक, विशाखा साळुंखे-सातारा-रौप्य, भक्ती पाटील-कोल्हापूर-कांस्यपदक. 200 मी. 16 वर्षांखालील मुलींमध्ये  आर्या सिनकर-डेरवण क्रीडा संकुल-सुवर्णपदक, प्रतीक्षा साबळे, मयुरी पाटील-कोल्हापूर अनुक्रमे रौप्य व कास्य.200 मी 18 वर्षांखालील मुली : काजल धनावडे-नाशिक-सुवर्णपदक, श्रेया मुळीक-सातारा-रौप्य, सुप्रिया मांडरे-पुणे-कांस्य. 100 मीटर (18 वर्षे) श्रेया मुळीक- सुवर्ण, वल्लभ पाटील-सुवर्णपदक.
गोळाफेक 18 वर्षे मुली : नंदिनी पांढर-सांगली-सुवर्ण पदक, हर्शिका नेपाळी-पुणे-रौप्य, कार्तिकी पाटील -कोल्हापूर-कास्य. 12 वर्षांखालील मुली : प्रीस्टल डिसोझा-मुंबई-सुवर्णपदक, पर्ल डिसोझा-मुंबई-रौप्य, शर्वरी घाणे-पुणे-कांस्य. 14 वर्षांखालील मुले: विशाल शेलार-मुंबई-सुवर्ण, 16 वर्षांखालील गटात चैतन्य फणसे-ठाणे-सुवर्ण. लांबउडी 16 वर्षे मुली : श्रुती घागरे-सातारा-सुवर्ण, श्‍वेता चिकोडी-कोल्हापूर-रौप्य, आशिया मुल्लानी-सांगली कांस्य. लांब उडी मुले : वल्लभ पाटील- सुवर्णपदक. 12 वर्षांखालील मुली : लांब उडी-ईशा रामटेके-सुवर्ण, 14 वर्षे उंच उडी : तुषार पाटील-सांगली-सुवर्णपदक, आर्यन पाटील-रायगड-रौप्य, अनिकेत माने-कोल्हापूर-कांस्यपदक.उंच उडी 16 वर्षांखालील मुले : धैर्यशील गायकवाड-कोल्हापूर-सुवर्ण, कुशल मोहिते-कोल्हापूर-रौप्य, अमन शेख-सांगली-कांस्य, 12 वर्षांखालील मुले : सार्थक निंबाळकर-सुवर्णपदक. थाळीफेक 16 वर्षे मुले : सत्यम यादव-सांगली-सुवर्ण, आर्य शाह-सांगली-रौप्य,  अथर्व गावडे-कांस्य. मुलींमध्ये गौरी भारती-सुवर्णपदक, कॅरममध्ये मुली : आकांक्षा कदम-साखरपा-सुवर्ण, केशर निरगुड-सावंतवाडी-रौप्य, प्रांजली आयरे-कास्य, मुलांमध्ये आर्पित बांदेकर-सुवर्ण  व तपन देशमुख-रौप्य (दोघे सावंतवाडी), निधीस भोसले-अलिबाग-कांस्य पदक. जिम्नॅस्टिक्स ऑलराऊंडर  स्पर्धेत 12 वर्षर्ंखालील स्पृहा शाहूला सुवर्णपदक, माही मेहता-रौप्य, रिया खिलारे-कास्य, साई खोंड-सुवर्ण, आर्या बेरी-रौप्यपदक पटकावले.