Tue, Jul 23, 2019 02:24होमपेज › Konkan › जिल्ह्यातील किनारे होणार जीवरक्षकांनी सज्ज

जिल्ह्यातील किनारे होणार जीवरक्षकांनी सज्ज

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 9:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आरे-वारे येथे जीवरक्षक, वॉच टॉवर, सूर्यास्तानंतर पोहोचण्यास मनाई या खबरदारीसह बचावाचे साहित्य ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील 14  किनार्‍यांवर यापूर्वी जीवरक्षक नेमण्यात आले असून  राहिलेल्या 17 किनार्‍यांवरही  सज्जता ठेवली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली. 
आरे-वारे किनारी पर्यटक बुडण्याच्या झालेल्या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले आहे.  जिल्ह्यातील किनारा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी तातडीची बैठक घेतली. तालुक्यातील आरे-वारे समुद्र किनारी एकाच बोरिवलीतील डिसोझा या कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतील.

जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागावर याची जबाबदारी टाकली आहे. कोकण पर्यटन विकासाच्या माध्यमातून त्यासाठी 54 लाख मंजूर आहेत. टेहेळणी मनोरे, लाइफ गार्ड, छोटी बोट आदी वस्तू देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य 17  किनारे संरक्षित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. टेहेळणी मनोरे उभारणे, जीवरक्षक नेमणे, बुडणार्‍यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी छोटी बोट घेणे, सेफ आणि डेंजर झोन तयार करणे, दोरीपासून अन्य साहित्यांचा यामध्ये समोवश आहे. या 14 व्यतिरिक्‍त कर्दे, लाडघर, आरे, वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. तसेच वेळणे, हर्णै, मुरूड, काजीरभाटी, आदीचा बीचच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव तयार केला जाणार याआहे.

किनारे सुरक्षेसाठी 2005 ला बनविलेल्या यादीत आरे-वारेचा समावेश नव्हता. गेल्या काही वर्षांत हा बीच पर्यटनासाठी पुढे आला. येथे सुरक्षेसाठी उपाय केलेले नव्हते. सध्या वारंवार दुर्घटना घडत असून गेल्यावर्षी पाच तरुणांचा येथे बुडून मृत्यू झाला होता. भरती-ओहोटीच वेळापत्रक लावणे, धोकादायक किनारा असा फलक लावणे, यापूर्वी मृत व्यक्‍तींचा आकडा फलकावर जाहीर करणे यासारख्या उपाययोजना करुन पर्यटकांचा जीव सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. तसेच आरे-वारे येथे ओहोटीच्यावेळी दुर्घटना घडतात; मात्र, त्याची सखोल चौकशी करुन तांत्रिक अहवाल तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मेरिटाईम बोर्ड आणि पोलिसांना दिले आहेत.

आरे-वारे समुद्र खवळला असून ओहोटीच्यावेळी पोहणार्‍यांना पाणी आतमध्ये खेचून घेते. याठिकाणी खाडीचे मुख असल्याने पाण्यालाही प्रचंड करंट आहे. त्यात उत्साही पर्यटक जीव धोक्यात घालतात. त्यामुळे आरे-वारेत तातडीने पाच जीवरक्षक नेमले जाणार आहेत. त्याची सर्व जबाबदारी जिल्हापरिषद ग्रामविकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे. चौदावा वित्त आणि कोकण ग्रामीण पर्यटन विकासमधून निधी दिली जाणार आहे.