Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Konkan › कोकणवासीयांच्या कटू आठवणी...

कोकणवासीयांच्या कटू आठवणी...

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:47PMडॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांवर नियतीने शनिवारी सकाळी घाला घातला. यानंतर कोकणच्या नशिबी आलेल्या काळ्याकुट्ट इतिहासातील घटना नजरेसमोर तरळून गेल्या. या घटनांमधील आक्रोश...अनेक कुटुंबांचे आधारवड हरपल्याने त्यांच्या नशिबी आलेली स्थिती या सर्वच गोष्टी मन खिन्न करणार्‍या आहेत. विद्यापीठाचे कर्मचारी आणि कुटुंबाचे कर्ते हरपले आणि संपूर्ण कोकणावरच शोककळा पसरली. याच अनुषंगाने कोकणच्या इतिहासातील काही भीषण दुर्घटनांचा फ्लॅशबॅक...

‘सावित्री’त 34 वर्षांपूर्वी 13 प्रवाशांना जलसमाधी

महाडमधील सावित्री पुलावर सुमारे 34 वर्षांपूर्वी एक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 13 प्रवाशांसह वाहून गेल्याची आठवण या घटनेच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे. मुंबई-गोवा राजमार्गावर सुमारे 36 ब्रिटिशकालीन पूल असून या पुलांचे आयुष्य संपल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुमारे 6 वर्षांपूर्वी कळवल्याचे सांगण्यात येत असून त्यातील सावित्री नदीवरील पूल हा अत्यंत धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

सावित्री 34 वर्षांपूर्वी एक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 13 प्रवाशांसह वाहून गेल्याची आठवण या अपघाताच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे. चिपळूण येथील हा टेम्पो कामत नामक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो होता. रस्तेमार्ग खबरदारी विभागाने प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी खबरदारीचे जे मार्ग सूचित केले त्यामध्ये पुलाच्या भवितव्याविषयी सावधानगिरीचा इशारा देण्याचे धोरण राबवल्याचे दिसून येते.  या महामार्गावरील अनेक ब्रिटिशकालीन पुलांचे कठडे आणि संरक्षक भिंतीच्या सुरक्षित दृष्टीकोनाच्या इभावातून इतरवेळी अनेक वाहने कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. 

वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 13 प्रवाशांसह इशारा देण्याचे धोरण राबवल्याचे दिसून येते. वाहून गेल्याची आठवण या घटनेच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी बावनदी, खेड, राजापूर, अर्जुना पूल, संगमेश्‍वर सोनगिरी पूल शंभर वर्षे ओलांडल्याने यांचे भवितव्य अधांतरी असल्याचे बोलले जात आहे. 

जगबुडीवरील बस अपघात

महाबळेश्‍वर येथील खासगी बस अपघातानंतर सुमारे सव्वा पाच वर्षांपूर्वी 19 मार्च 2013 रोजी पहाटेच्यावेळी खेड तालुक्यातील जगबुडी पुलावरून नदीत कोसळलेल्या खासगी बसच्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. भरणे येथील पूल ब्रिटिशकालीन असून, तो वापरण्यायोग्य नसल्याचे पत्र ब्रिटिशांकडून सरकारला प्राप्त झाले आहे. 

या पुलाला पर्याय म्हणून महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तेथेच दोन पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. जगबुडी नदीवरचा पूलसुद्धा ब्रिटिशकालीन आहे. तो आता वापरण्यास सुरक्षित नसल्याचे पत्र ब्रिटिशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच पाठवले आहे. हा पूल किती असुरक्षित आहे याचा अनुभव सव्वा तीन वर्षांपूर्वी 19 मार्च 2013 रोजी झालेल्या अपघातातून आला. गोव्याकडून मुंबईकडे जाणारी महालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. या अपघातात 37 प्रवाशांचा मृत्यू झाला. 18 जण जखमी झाले होते. त्यातील काहींचे प्राण उपचारानंतर बचावले. ब्रिटिशकालीन पूल असल्याने त्याचे रेलींग कमकुवत झाले होते. रेलिंग कमकुवत नसते तर बस त्यावर आदळून नदीत कातळावर कोसळली नसती. पर्यायाने जीवितहानीसुद्धा कमी झाली असती. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर कोकणातील पुलांच्या शेजारी महामार्गासाठीचे पूल उभे राहिले आहेत. मात्र, चौपदरीकरण झाल्यानंतरच त्याचा वापर सुरू होईल. 

‘नागोठणे’तील 27 वर्षांपूर्वीचा अपघात

महाबळेश्‍वर येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दुर्दैवी अपघातानंतर 27 वर्षांपूर्वी नागोठणे परिसरात झालेल्या पावसाळी हंगामातील भीषण अपघाताच्या आठवणी चिपळूणवासीयांच्या मनात पुन्हा एकदा जाग्या झाल्या. या अपघातात चिपळुणातील एका व्यापार्‍याच्या कुटुंबासहीत शहरातील अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती.

सत्तावीस वर्षांपूर्वी नागोठणे पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी चिपळूणवासीयांनी जागृत केल्या. त्यावेळी देखील चिपळूणातील मोठ्या प्रमाणात प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. त्यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंबाचा समावेश होता. तसेच खासगी वाहनाने देखील म्हणजेच त्या वेळच्या टेम्पो या वाहनाने देखील मुंबईकडे गेलेल्या चिपळुणातील अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. त्यांपैकी अनेकांच्या मृतदेहांचा शोधकार्यानंतरही शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. त्यावेळी जोरदार पर्जन्यवृष्टी  सुरू असताना मुंबईकडे दुपारनंतर रवाना झालेली वाहने त्यावेळी नागोठणे परिसरातून प्रवाहीत होणार्‍या नदीपात्राच्या पाण्यात प्रचंड वाढ होऊ लागली. पात्रातील पाणी पुलावरून प्रवाहीत होत होते. त्याचवेळी कोकणातून मुंबईच्या दिशेकडे जाणारी काही वाहने पुलावरून मंदगतीने प्रवास करू लागली. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा जोर पाहता अनेक वाहने पुलावरच उभी करण्यात आली होती. काही कालावधीत पाणी प्रवाहाचा जोर व पाण्याची पातळी वाढू लागली.
पातळी व जोर वाढू लागताच वाहनातील प्रवासी हळूहळू सुरक्षिततेसाठी वाहनांच्या टपावर जाऊन बसू लागले. मात्र, एकीकडे पावसाचा वाढता जोर व पाण्याच्या पातळीसहीत प्रवाहात वेगाने होत असलेली वाढ या सर्वांच्या परिणामी पुलासहीत त्यावरील सर्व वाहने रात्रीच्या सुमारास वाहून गेली. यामध्ये चिपळूणातील मुंबई येथे लग्नकार्यासाठी जाणार्‍या एका व्यापारी कुटुंबाचा समावेश होता. अन्य खासगी वाहनातून प्रामुख्याने टेम्पोमधून जाणार्‍या चिपळूणातील अनेक प्रवाशांचा यामध्ये समावेश होता. या सर्वांना काही क्षणातच पाण्याने गिळंकृत केले. ही माहिती चिपळूणात धडकताच मुंबईकडे गेलेल्या आपल्या नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी शहरातील अनेक कुटुंबियांनी नागोठणेकडे धाव घेतली होती. काही काळातच शहरात या भीषण घटनेची माहिती मिळून संपूर्ण शहर सुन्न झाले. त्याच आठवणी सुमारे सत्तावीस वर्षांनंतर चिपळूणात जागृत झाल्या. 

लग्नाच्या वर्‍हाडाच्या ट्रकला काजिर्डा येथे अपघात

राजापूर तालुक्यातील ताम्हाने येथून काजिर्ड्याकडे चाललेले लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणारा ट्र्क जामदा नदीत कोसळून सुमारे 34 जण दगावले होते. महाडमधील दुर्घटनेत राजापूर बोरीवली गाडी वाहून गेल्याची खबर येताच सर्वांना दहा वर्षांपूर्वी झालेल्या काजिर्डा अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.ताम्हानेमधील नवरा मुलाचे वर्‍हाड घेऊन काजिर्डा येथे मुलीच्या घरी जाणारा ट्र्क काजिर्डा येथील चढाव चढताना अचानक न्यूट्रल झाला होता. त्यावेळी त्या ट्र्कमध्ये एकूण 175 च्या आसपास वर्‍हाडी होते. त्यापैकी सुमारे दहा-पंधरा जण ड्रायव्हरच्या केबिनमध्ये होते. 

अचानक गाडी मागे येऊ लागताच चालकाने ती थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तो ट्र्क न थांबता वेगाने लगतच्या खोल दरीत कोसळला होता. त्या भीषण अपघातात सुमारे 30 जण जागीच गतप्राण झाले होते. अन्य चारजण नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडले होते तर जवळपास दीडशेजण गंभीररित्या  जखमी झाले होते. सर्व जखमींना रायपाटण व रत्नागिरीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या अपघातात काही जणांना  आपापली मुले गमवावी लागली होती. सहा ते सात लहान मुलांचा मृतांत सामावेश होता. 

ताम्हाने गावात पूर्वापार काळ्या दगडांच्या घडणावळीची कामे करणारे कारागीर होते. त्यांपैकी अनेकजण त्या अपघातात मृत्युमुखी पडले होते. राजापूर तालुक्याच्या इतिहासात सर्वात तो मोठा जीवघेणा अपघात होता. तो बारा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर अनेक अपघात घडले त्यामध्ये वडदहसोळ गावात भू:स्खलन होऊन घरावर लगतच्या डोंगराचा कडा कोसळून एकाच घरातील आठजण गाडले गेले होते. डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या शनिवारी झालेल्या भीषण अपघातानंतर राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथे झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

कोकणचा अपघातांचा महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या पन्नास वर्षात हजारो लोकांचे अपघातामध्ये बळी गेले आहेत. कोकणातील वळणाचे रस्ते हे या अपघाताचे प्रमुख कारण आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे म्हणून अनेक निवेदने, पत्रे सादर करण्यात आली. कोकणातील पत्रकारांनी चौपदरीकरणासाठी अनेक आंदोलने केली. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई ते इंदापूर या टप्प्याचे काम सुरू झाले. मात्र, ठेकेदार तसेच तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यानंतर भाजपप्रणीत लोकशाही आघाडीने इंदापूरपासून बांद्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम मंजूर केले. या मार्गावरील 14 पुलांचे काम सुरू झाले. काही अपवाद वगळता पुुलांचे काम पूर्ण झाले आहे. काही ठेकेदार कंपन्यांनी केलेल्या कामामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघातही झाले आहेत. शासनाकडून या महामार्गासाठी निधीची उपलब्धताही झाली असल्याने या महामार्गाचे काम वेगात सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गाने हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. याला येथील नैसर्गिक स्थिती कारणीभूत आहे. निसरडे, वळणाचे रस्ते त्याचबरोबर समोरून वाहन येताना न दिसल्याने व ओव्हरटेकच्या नादात, झोपेत अशा स्वरुपात हे अपघात झाले आहेत.