Thu, Aug 22, 2019 11:20होमपेज › Konkan › कोकण विद्यापीठासाठी कृती समिती आक्रमक

कोकण विद्यापीठासाठी कृती समिती आक्रमक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर तब्बल 800 महाविद्यालयांचा असणारा ताण, मुंबई आणि कोकणचे एकमेकांना भिन्न असणारे शैक्षणिक व सामाजिक प्रश्‍न, आठ लाख विद्यार्थ्यांना सेवा देण्यास मुंबई विद्यापीठाची अकार्यक्षमता असे अनेक प्रश्‍न लक्षात घेऊन सरकारने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, या मागणीसाठी कृती समिती आक्रमक झाली आहे. मुंबई विद्यापीठाला प्रदीर्घ आणि गौरवास्पद परंपरा असली तरी या विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालये आणि विद्यार्थीसंख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मंगळवारी मुंबईतील पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष, विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी दिली. त्यांच्यासोबत कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यावेळी उपस्थित होते. कोकण जोडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांची संख्या 800 वर पोहोचली.  

  मुंबई विद्यापीठ  टीकेचे धनी

 प्रतिनिधी विद्यापीठाच्या कारभारात अनेक शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी येत  आहेत. निकालाचा वाढता गोंधळ, पेपरफुटी, हॉल तिकीटांचा गोंधळ अशा घटनांमुळे मुंबई विद्यापीठाच्या एकूणच काराभारावर गेल्या काही वर्षांपासून टीका होत आहे. आठ लाख विद्यार्थ्यांना सांभाळणे विद्यापीठ प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे प्रशासकीय दृष्टीने मुंबई विद्यापीठ हे कोकणातील, विशेषत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महाविद्यालयांसाठी गैरसोयीचे ठरते. म्हणून सध्याच्या मुंबई विद्यापीठाचे विभाजन करुन रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील असलेल्या 103

महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे, अशी मागणी होत आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांचा पाठींबा असून सरकारने इच्छाशक्ती प्रभळ करुन कोकणातील गुणवान विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेला न्याय द्यावा, असेही अ‍ॅड. पाटणे यांनी यावेळी सांगितले. स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी कृती समितीचा पुढाकार असून या समितीत सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी  आहेत. कोकणातील या तीन जिल्ह्यांतील शिक्षण संस्थांचे चालक, प्राचार्यांनी पुढाकार घेतला आहे. कोकणासाठी स्वतंत्र माध्यमिक मंडळ झाल्यानंतर येथील विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीत गुणवत्ता सिद्ध केली. तसेच,

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ गरजेचे आहे, असे अ‍ॅड. पाटणे यांनी सांगितले. सर्वाधिक मत्स्योत्पादन कोकणात आणि विद्यापीठ नागपुरात  राज्यात होणार्‍या एकूण मत्स्योत्पादनाच्या 72 टक्के मत्स्योत्पादन कोकणात होते. यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, मत्स्य विद्यापीठ 
नागपुरात आहे. भौगोलिक परिस्थिती मत्स्योत्पादनाचे प्रमाण पाहता स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ जोडण्याची गरज आहे.