Thu, Jun 27, 2019 13:58होमपेज › Konkan › मान्सून द्रूतगतीने...कोकण रेल्वे मंदगतीने!

मान्सून द्रूतगतीने...कोकण रेल्वे मंदगतीने!

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 11:22PMकणकवली : नितीन सावंत

मान्सूनची वाटचाल   दक्षिणेकडून उत्तरेकडे द्रूतगतीने सुरू असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने गाड्यांचा वेग कमी केला आहे.

कोकण रेल्वेने मान्सूनसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. या कालावधीमध्ये रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 कि. मी. प्रतितास असणार आहे. तसेच सर्वच धोकादायक ठिकाणी चोवीस तास गस्त असणार आहे.

कोकण रेल्वेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही पावसाळा कालावधीसाठी नवीन वेळापत्रक तयार केले आहे.कोकणातील अतिवृष्टीचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.त्यानुसार रेल्वे मार्गावरून धावणार्‍या गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये रेल्वे मार्गावर येणारे पाणी, दरडी कोसळण्याचा धोका, रेल्वेमार्ग खचण्याचा धोका लक्षात घेऊन त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी हे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक पुढीलप्रमाणे : सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (अप) : सावंतवाडी 8.30 वा., झाराप 8.42 वा., कुडाळ 8.53 वा., सिंधुदुर्ग 9.04 वा.,कणकवली 9.20वा., नांदगाव 9.35 वा., वैभववाडी 9.57 वा. दिवा-सावंतवाडी (डाऊन) : वैभववाडी 15.10 वा., नांदगाव 15.24 वा., कणकवली 14.45 वा., सिंधुदुर्ग 16.03वा., कुडाळ 16.23 वा.,झाराप 16.36 वा., सावंतवाडी 17.10 वा. मांडवी एक्स्प्रेस (अप) : सावंतवाडी 9.41वा., कुडाळ 10.30 वा.,सिंधुदुर्ग 10.42 वा., कणकवली 11.01वा., वैभववाडी 11.31वा., मांडवी एक्स्प्रेस (डाऊन) : वैभववाडी 16.56 वा., कणकवली 17.30 वा., सिंधुदुर्ग 17.48वा., कुडाळ 18.02 वा., सावंतवाडी 18.21 वा., जनशताब्दी (अप) : मडगाव 12.00 वा., कुडाळ 14.00 वा., कणकवली 14.30 वा., रत्नागिरी 16.30 वा., दादर 23.05वा.,जनशताब्दी (डाऊन) : दादर 5.25 वा., रत्नागिरी 11.05 वा., कणकवली 13.30 वा., कुडाळ 14.02 वा., मडगाव 16.20 वा.,तुतारी एक्स्प्रेस (अप) : सावंतवाडी 17.30 वा., कुडाळ 17.54 वा., सिंधुदुर्ग 18.08 वा., कणकवली 18.28 वा., नांदगाव 18.42 वा., वैभववाडी 19.00वा., तुतारी एक्स्प्रेस (डाऊन) : वैभववाडी 8.48 वा.,नांदगाव 9.10 वा.,कणकवली 9.30वा., सिंधुदुर्ग 10.02 वा., कुडाळ 10.30वा., सावंतवाडी 12.00वा., कोकणकन्या एक्स्प्रेस (अप) : सावंतवाडी 18.15वा., कुडाळ 18.48 वा., सिंधुदुर्ग 18.58वा., कणकवली 19.13वा., वैभववाडी 19.45 वा., रत्नागिरी 22.00वा.,सीएसटी 5.50वा.,कोकणकन्या (डाऊन) : सीएसटी 23.05 वा.,रत्नागिरी 6.00 वा., वैभववाडी 7.35 वा.,कणकवली 8.05वा., सिंधुदुर्ग 8.24 वा., कुडाळ 8.40 वा., सावंतवाडी 9.14 वा. मुंबई एक्स्प्रेस (अप) : मडगाव 21.40 वा., कणकवली 23.56 वा.,सीएसटी 10.33 वा., मंगलोर (डाऊन) : सीएसटी 22.02वा.,कणकवली 6.40 वा., मडगाव 8.50वा.,मंगला एक्स्प्रेस (अप) : मडगाव 1.25 वा.,कणकवली 3.32 वा., कल्याण 13.40वा.(डाऊन) : कल्याण : 8.32 वा., कणकवली 17.20 वा., मडगाव 19.30वा., मत्स्यगंधा एक्स्प्रेस (अप) : मडगाव 19.05वा., कुडाळ 20.52 वा., ठाणे 5.53 वा. (डाऊन) ठाणे : 15.42 वा.,कुडाळ 00.54 वा.,मडगाव 2.45 वा.नेत्रावती (अप): मडगाव 5.50वा.,कुडाळ 8.00 वा., ठाणे 17.01वा. (डाऊन) : ठाणे 12.05वा.,कुडाळ 21.28 वा., मडगाव 23.15वा.