Wed, Nov 21, 2018 15:52होमपेज › Konkan › कोकण रेल्वेमार्गावर अज्ञाताचा मृतदेह

कोकण रेल्वेमार्गावर अज्ञाताचा मृतदेह

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:21PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

कोकण रेल्वेमार्गावर राजापूर रोड स्थानकापासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर गोपाळवाडी बोगद्यानजीक एका अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह छिन्‍नविच्छिन्‍नावस्थेत रुळावर आढळून आला. या घटनेतील मृताची ओळख  अद्याप पटलेली नाही. रेल्वेची धडक बसून अगर गाडीतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याबाबत राजापूर पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री कोकण रेल्वेमार्गावर गस्त घालणार्‍या ट्र्ॅकमनला रेल्वे रुळावर हा मृतदेह आढळून आला. तो छिन्‍नविच्छिन्‍न अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती. याची खबर तातडीने राजापूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर राजापूरचे सहायक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेतील मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाचा टी-शर्ट व त्यावर लाल व काळ्या रंगाचा स्वेटर तसेच राखाडी रंगाची ट्रॅक पँट परिधान केली होती.