Sun, Nov 18, 2018 11:18होमपेज › Konkan › रिफायनरीबाबतीत मुख्यमंत्र्यांचे गलिच्छ राजकारण

रिफायनरीबाबतीत मुख्यमंत्र्यांचे गलिच्छ राजकारण

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 25 2017 1:37AM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

ऑईल रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी गलिच्छ राजकारण चालवलं आहे. आपण या विषयावर काहीही बोलणार नाही. या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असे स्पष्टीकरण केंद्रीय अवजड उद्योग मंत्री तथा शिवसेना उपनेते अनंत गीते यांनी खेडमध्ये केले आहे.

ऑईल रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आणण्यासाठी शिवसेनेचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री  अनंत गीते आणि विनायक राऊत आग्रही होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पडसाद उमटले.

या संदर्भात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा शिवसेना उपनेते अनंत गीते हे खेड येथील भरणे नाका येथील कुणबी समाजोन्नती संघ आयोजित  ‘कुणबी कबडी  लीग’च्या उद्घाटनासाठी आले असता ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. 

ना. अनंत गीते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून ऑईल रिफायनरी बाबतीत मुख्यमंत्र्यांनी गलिच्छ राजकारण चालवलं आहे. मी या विषयावर काहीही बोलणार नाही.तसेच राजापूर येथील स्थानिकांनी या रिफायनरीला विरोध केल्यास आपण ही रिफायनरी गुहागरला आणू. तेथे आपण जागा उपलब्ध करून देऊ, असे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी या आधी जाहीर केले होते. गुहागरमध्ये जागा उपलब्ध करून देणार का, या प्रश्‍नाचे उत्तर देताना मी या विषयावर काहीही बोलू इच्छित नाही.