Fri, Nov 16, 2018 08:44होमपेज › Konkan › अ‍ॅसिडवाहू टँकर उलटून ५ तास वाहतूक ठप्प

अ‍ॅसिडवाहू टँकर उलटून ५ तास वाहतूक ठप्प

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:06PM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

मुंबई - गोवा महामार्गावर असगणी फाटा येथे नायट्रिक अ‍ॅसिड घेऊन मुंबईहून गोव्याला निघालेल्या टँकरला समोरून येणार्‍या आराम बसने ठोकर दिल्याने टँकर महामार्गाच्या डाव्या बाजूला उलटला. असगणी फाटा येथे रविवारी मध्यरात्री 1.30 वा. हा अपघात झाला. यामध्ये टँकरला गळती लागल्याने विषारी धुरामुळे परिसरात उग्र वास पसरला होता. महामार्गावरही मोठा धूर झाल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली होती. टँकर चालक गंभीर जखमी आहे.