Wed, Sep 26, 2018 18:57



होमपेज › Konkan › केळूस येथे ७५० हापूस कलमे आगीत बेचिराख

केळूस येथे ७५० हापूस कलमे आगीत बेचिराख

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:05PM

बुकमार्क करा




केळूस येथील कुंदनलाल चावला यांच्या 50 एकर क्षेत्रातील आंबा कलम बागेस आग लागून सुमारे 50 लाखाचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी 10 .15 वा.वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास  आटोक्यात आली. 

आगीचे वृत्त समजताच सभापती, पोलिस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामस्थ तसेच आकाश फिश मिलच्या 80 कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आठ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या 2200 हापूस आंबा कलमांपैकी  750 कलमे या आगीत खाक झाली. बागेतील कामगारांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी माहिती बागेचे व्यवस्थापक अनिल नाईक यांना दिली. कुडाळ नगरपंचायतीचा अग्निबंब केळूसकडे निघाला असता हुमरमळा आंदुर्ले येथे अग्निशमन बंबाच्या गाडीचे पाटे तुटल्याने गाडी तिथेच राहिली.त्यानंतर नाईक यांनी आगीची कल्पना वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन दल व पोलिस स्टेशनला दिली. या आगीची माहिती केळूस सडा येथील आकाश फिश मिलला समजताच आकाश फिश मिलच्या व्यवस्थापकाने 80  कामगारांना आग विझविण्यासाठी घटनास्थळी पाठवले. तबल 12 टँकरद्वारे आग विझवण्याचे काम सुरु होते. केळूस ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले.  

दुपारी तीनच्या सुमारास आग आटोक्यात आल्याने वेंगुर्ले अग्निशमन दलाच्या बंबास परत पाठवण्यात आले. मात्र डोंगर उतार भागातील आग विझली नसल्याचे लक्षात येताच अग्निशमन बंबास पुन्हा बोलविण्यात  आले. सायंकाळी 5.45 वा. च्या  सुमारास आग विझवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
आग विझविण्यासाठी सभापती यशवंत परब, बाळा दळवी, पोलिस निरीक्षक बी. जी. बाकरे, पोलिस उपनिरीक्षक कळसुलकर, पोलिस कर्मचारी ए. जी. घाटकर, के. आर. नाईक, कांबळी, खोत, पांचाळ तलाठी पी. एस. गवाणकर, सरपंच किशोर केळुसकर, उपसरपंच आबा खवणेकर, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग केळुसकर, माजी सरपंच योगेश  शेटे, विनायक परब, बापू आसोलकर, भाई मोबारकर, उमेश मुणनकर, सुनील केळुसकर, राजा शेटे, बी. जी. शेळके, अशोक तुळसकर यांच्यासह आकाश फिश मिलचे कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.