Sat, Nov 17, 2018 16:35होमपेज › Konkan › वाहन चालकांनो सावधान ; कशेडी घाट खचतोय 

वाहन चालकांनो सावधान ; कशेडी घाट खचतोय 

Published On: Jul 15 2018 3:03PM | Last Updated: Jul 15 2018 3:03PMपोलादपूर : धनराज गोपाळ

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गेल्या दहा वर्षात शासनाने लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली असली तरी संततधार पावसामुळे कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत महामार्गावर रस्त्याला तडे गेले आहेत. यामुळे येथील प्रवास धोकादायक बनला आहे. 

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कशेडी घाटातील रस्ता खचत असल्याने वाहन चालकानो सावधान म्हणण्याची वेळ आली आहे. 

या रस्ता खाचल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे स पो नि प्रकाश पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलीस वाहतूक मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी एएसआय गमरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह तातडीने घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली.

या बाबत नॅशनल हायववे चे उप कार्यकारी अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला त्‍यांनी रस्‍त्याची भीती नाही पण रस्ता जस जसा खाचेल तसे आम्हीं भराव करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.