Mon, Apr 22, 2019 05:44होमपेज › Konkan › करूळ घाटात कार कोसळली

करूळ घाटात कार कोसळली

Published On: Feb 18 2018 1:59AM | Last Updated: Feb 17 2018 11:00PMवैभववाडी : प्रतिनिधी 

समोरून येणार्‍या वाहनाला बाजू देताना रस्त्याचा अंदाज न आल्याने फोर्ट इंडेव्हर कार सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कार चालकासह एकाच कुटुंबातील सातजण जखमी झाले आहेत. यातील एका अकरा वर्षांच्या मुलगीला गंभीर दुखापत झाली आहे. तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करूळ घाटात दिंडवणेजवळ घडली.

मुंबई वसईहून कोल्हापूरमार्गे मालवण तारकर्लीकडे आपल्या ताब्यातील  कारचालक किरण कृष्णा गायकवाड (27) हा घेऊन जात होता. कार करूळ घाटातून वैभववाडीकडे येत असताना दिंडवणेजवळ एका वळणावर समोरून येणार्‍या ट्रकला बाजू देताना अंदाज आला नाही.  त्यामुळे कार सुमारे 300 फूट दरीत कोसळली. या कारमधून एकाच कुटुंबातील कार चालकासह सातजण जखमी झाले आहेत. तर यातील अकरा वर्षांच्या मुलगीच्या कमरेला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

घाटात कार दरीत कोसळल्याची माहिती मिळताच करूळ येथील रामेश्‍वर युवा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जीवाची पर्वा न करता खोल दरीतून जखमींना बाहेर काढले व सर्वांना ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या कारमधून प्रवास करणारे जिया जितेंद्र सिंग (वय 11) हिला गंभीर दुखापत झाली आहे. अथर्व जितेंद्र सिंग (8), किरण कृष्णा गायकवाड (चालक, 27), अंजली कैलास सिंग (20), पल्लवी जितेंद्र सिंगष (33), जान्हवी जितेंद्र सिंग (13), जितेंद्र बबन सिंग (37) या अपघातात जखमी सर्व (रा. वसई) येथील रहिवासी आहेत.