होमपेज › Konkan › कणकवली चौपदरीकरण, कणकवलीकरांचा बंद 

कणकवली चौपदरीकरण, कणकवलीकरांचा बंद 

Published On: Dec 07 2017 9:04AM | Last Updated: Dec 07 2017 9:04AM

बुकमार्क करा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

कणकवली चौपदरीकरण सरकारच्या निवाड्याचा तसेच कणकवलीकरांची फसगत करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध म्हणून प्रकल्पग्रस्त व व्यापारी, तसेच ६ इतर संघटनांनी पाठींबा देत कणकवली बंदची हाक देण्यात आली आहे.

चौपदरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींना मिळणारा भाव हा अल्प असून, आजचा बाजरभाव मिळाला पाहिजे.  व्यवसायिकांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळाली पाहिजे. भाडेकरूंना उद्धवस्त करू नका, बाधित होणाऱ्या स्टॉलधारकांना न्याय मिळाला पाहिजे, शहरातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. अशा मागण्यासाठी हा बंद पुकारला आहे. या मुळे सकाळ पासूनच बाजारात शुकशुकाट दिसत आहे. 

सकाळपासूनच शहर पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. तर सरकारला जाग येण्यासाठी बाजारपेठ मार्गे प्रातकार्यालयावर ९. ३० वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.