Thu, Jul 18, 2019 02:33होमपेज › Konkan › जिल्ह्यात आजपासून होळी उत्सवाची रंगत

जिल्ह्यात आजपासून होळी उत्सवाची रंगत

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:59PMकणकवली : प्रतिनिधी

‘होळी रे होळी पुरणाची पोळी...’ अशा आरोळ्या देत होळी उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. गुरुवारी होळी पौर्णिमेदिवशी सायंकाळी जिल्हाभर होळ्या घातल्या जाणार आहेत. त्यानंतर पाच, सात, पंधरा दिवस या होळी उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. त्यात खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि पारंपरिक गावर्‍हाटीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम  पार पडणार आहेत. या होळी उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी मंडळीही काही प्रमाणात गावागावांत दाखल झाली आहे.

कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळी उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवारपासून या उत्सवाला प्रारंभ होत असल्याने या उत्सवाची सुरुवात तांदळाच्या शेवया आणि नारळाचा रस, पुरणपोळ्या व कटाची आमटी या गोडधोड पदार्थांनी होणार आहे.