Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Konkan › पोटात गेलेली ‘कवळी’ विनाशस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर!

पोटात गेलेली ‘कवळी’ विनाशस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर!

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:51PMकणकवली : वार्ताहर 

कणकवली-शिवाजीनगर येथील वासुदेव पांडुरंग मोंडकर (57) यांच्या दाताची कवळी  गोळ्या घेत असताना नकळत अन्ननलिकेद्वारे पोटात गेली़  वासुदेव मोंडकर यांना काही वेळात दाताची कवळी पोटात गेल्याचे लक्षात येताच त्यांना तत्काळ उपचारासाठी कणकवलीतील डॉ़ मयूर नागवेकर यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.डॉ.नागवेकर यांनी  त्यांच्यावर एन्डोस्कॉपीद्वारे उपचार करत अडीज इंची दाताची कवळी विनाशस्त्रक्रिया बाहेर काढण्यात  यश मिळवत वासुदेव मोंडकर यांना पुनर्जन्म दिला.

कणकवलीतील  एसटी मेकॅनिक वासुदेव मोंडकर हे 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा.नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर गोळ्या घेत होते़  यावेळी पाण्याबरोबर  चार दातांची कवळी निघून ती गोळ्यांसोबत अन्ननलिकेद्वारे पोटात गेली़ डॉ़ मयूर नागवेकर यांनी  वासुदेव मोंडकर यांना धीर देत घाबरण्याचे कोणतीही गरज नसल्याचा विश्‍वास दिला.22 फेब्रुवारी रोजी डॉ.नागवेकर यांनी एन्डोस्कॉपीद्वारे पोटातील कवळी विनाशस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली.

डॉ़ नागवेकर यांच्यामुळे पुर्नजन्म ः वासुदेव मोंडकर

डॉ़ मयूर नागवेकर यांनी मला मानसिकदृष्ट्या आधार देत एन्डोस्कॉपीद्वारे अन्ननलिकेत पाईप टाकून अलगद कवळी काढण्याचे तीन वेळा प्रयत्न केले.मात्र, त्यात यश आले नाही.अखेर  भालचंद्र महाराज व स्वामी समर्थांचे नाव मी घेतले.त्यानंतर डॉ़ मयूर नागवेकर यांनी कोणतीही इजा न पोहचवता अडीच इंचाची अडकलेली कवळी पोटातून बाहेर काढली़  डॉ.नागवेकर यांनी मला पुनर्जन्मच दिल्याची भावना  वासुदेव मोंडकर यांनी व्यक्त केली.