Sun, May 26, 2019 09:07होमपेज › Konkan › जानवली येथे मंदिरात चोरी

जानवली येथे मंदिरात चोरी

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:26PMकणकवली : वार्ताहर

जानवली-दळवीवाडी येथील श्री भवानी मंदिराचा दरवाजा फोडून चोरट्याने देवीच्या गळ्यातील दागिने, चांदीच्या पतवा तसेच दानपेटी फोडून आतील रोकड असा सुमारे 27 हजार 180 रू. चा मुद्देमाल लंपास केला. ही चोरी बुधवारी  मध्यरात्रीच्या सुमारास झाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे.सायंकाळी ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण केले. 

मंदिरात चोरी झाल्याची तक्रार साईचंद्र दत्तात्रय दळवी यांनी कणकवली पोलिसांत दिली. दळवी हे देवीची पूजा करतात. बुधवारी सायंकाळी मंदिराचा दरवाजा त्यांनी कुलूपबंद केला होता. गुरूवारी सकाळी 8.30 वा. च्या सुमारास वाडीतील गणपत वसंत चव्हाण यांनी साईचंद्र दळवी यांच्या घरी जाऊन भवानी मंदिराच्या गाभार्‍याचा दरवाजा उघडा आहे, तर आतील दानपेटी रिगल कॉलेजजवळून जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला उघडलेल्या स्थितीत आहे, असे सांगितले. त्यानंतर दळवी यांनी भवानी मंदिरात धाव घेतली. यावेळी देवीच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम सोन्याच्या डवल्या असलेले काळ्या मण्यांचे सुमारे 11 हजार 111 रू. चे मंगळसूत्र, देव्हार्‍यात पूजेसाठी ठेवलेल्या  11 हजार 069 रू. च्या चांदीच्या सात पतवा तसेच फंडपेटीतील 5 हजार रु. ची रोकड असा सुमारे 27 हजार 180 रु. चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. मंदिरापासून काही अंतरावर दानपेटी उघडलेल्या स्थितीत दिसून आली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिस करत आहेत.