Sun, Dec 15, 2019 02:57होमपेज › Konkan › कणकवलीचा पुढील आमदार महायुतीचाच असेल! 

कणकवलीचा पुढील आमदार महायुतीचाच असेल! 

Published On: May 25 2019 2:09AM | Last Updated: May 24 2019 11:57PM
सावंतवाडी ः प्रतिनिधी 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कणकवलीत 65 हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याच्या गमजा मारल्या होत्या. परंतु त्यांना ते शक्य झालेले नाही. बदललेली ही राजकीस स्थिती पहाता, यापुढील कणकवलीचा 
आमदार हा महायुतीचाच असेल, असा ठाम आत्मविश्‍वास नवनिर्वाचित खा. विनायक  राऊत  यांनी व्यक्‍त केला.   झालेल्या मतदानावर आपण समाधानी असून मतदारांच्या उपकाराचे ओझे घेऊन यापुढे विकासात्मक कामांची पूर्तता करणार व दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते सावंतवाडी येथे  पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.  पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक, भाजपा नेते संदेश पारकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब,  मतदारसंघ  प्रमुख विक्रांत सावंत,  भाजपा जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, शहर प्रमुख शब्बीर मणियार, जि. प. सदस्य मायकल डिसोजा, राजन मुळीक, समिती सदस्य मेघःश्याम काजरेकर, महिला उपशहर प्रमुख अपर्णा कोठावळे, कोलगाव सरपंच मारिया डिमेलो, प्रशांत कोठावळे, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी,  युवासेना  उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी, पं.स. सदस्य नारायण राणे आदींसह सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व  उपस्थित होते. 

खा. राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना-भाजपा तसेच रिपाई, रासाई पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते. शहरातील नागरिकांनी ही त्यांना   शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पहिल्या टर्ममध्ये जिल्ह्यातील दादागिरी मोडीत मोडून काढून विजय संपादन केला व ही दुसरी टर्म असून त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विजय मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावे, अशी मागणी आम्ही पंतप्रधान व पक्षप्रमुखांकडे करणार असल्याचे ना.केसरकर यांनी सांगितले. खा. राऊत म्हणाले,  या निवडणुकीमध्ये अनेकांचे अंदाज चुकले. मतदारांनी पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्य देऊन माझ्या विजयाचा अंदाज खरा ठरविला. बाळासाहेब  आणि कोकणचे नाते हे घट्ट नाते असून जे प्रेम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले तेच प्रेम जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देत आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य व्यक्‍तीला केंद्रबिंदू मानून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला. मोदींनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्‍वासाच्या बळावर मोदी सरकार पुन्हा एकदा आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसेना, भाजपा रिपाई, रासाई पदाधिकार्‍यांनी मेहनत घेऊन काम केल्यामुळे आपण विजयी झालो. विरोधकांना धडकी भरविणारा हा विजय असल्याचे सांगितले.   

त्यांना आपला भूतकाळ आठवला असेल!

खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निकालात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्‍त केल्याबद्दल खा. राऊत यांना विचारले असता,  नारायण राणेंना आपला भूतकाळ आठवला असल्याचे, खोचक उत्तर त्यांनी दिले. तसेच गेल्या पाच वषार्ंंत आपण मतदारसंघात जेवढे फिरलो तेवढे नारायण राणे आयुष्यात फिरले नसतील, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले.