Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Konkan › शिक्षण हे समृध्दीचे माध्यम : आ. नितेश राणे

शिक्षण हे समृध्दीचे माध्यम : आ. नितेश राणे

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:02PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

शिक्षण हे माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून समृध्दीचे माध्यम आहे.  शिक्षण हेच आयुष्यात परिवर्तन घडवू शकते. शिक्षण आणि संस्कारातून माणूस वैचारीक दृष्ट्या समृध्द होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत शिकण्याचा ध्यास ठेवून ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नेहमीच राजकीय व सामाजिक जीवनात शिक्षणाला मोठे महत्त्व दिले आहे. आयडियल इंग्लिश स्कूल भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तसेच देश व राज्य पातळीवरील गुणवत्तेत अव्वल दर्जा मिळवेल, असा विश्‍वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. 

वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कणकवलीच्या सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, जि. प. सदस्या सौ. स्वरूपा विखाळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, बुलंद पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा. निलेश महेंद्रीकर, डी.पी. तानवडे, पं. स. सदस्य मिलींद मेस्त्री, सौ. राधिका सावंत, वरवडे सरपंच विनोदिनी मेस्त्री, सोनू सावंत, संदीप मेस्त्री, मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका अर्चना देसाई, शितल सावंत, दयानंद उबाळे, डॉ. हेमा तायशेटे, फिरोज पटेल, डॉ. सविता तायशेटे, सौ. सुलेखा भिसे, सौ.मनिषा सावंत,  सौ. गौसिया पटेल, बिडवाडी सरपंच सुदाम तेली आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात आ. नितेश राणेंच्या हस्ते शाळेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.तसेच मुलांना बक्षिसे देण्यात आली. संस्थेच्या वतीने आ. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. भाग्यलक्ष्मी साटम यांनीही आयडियल स्कूलला शुभेच्छा दिल्या. 

सायंकाळी उशिराच्या सत्रात या स्नेहसंमेलनानिमित्त खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर आदी मान्यवरांनी आयडीयल इंग्लिश स्कूलला भेट दिली. खा. विनायक राऊत यांनी मंजूर केलेल्या 10 लाखाच्या निधीतून शाळेच्या प्रयोगशाळेचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी खा. राऊत यांचा सत्कार करण्यात आला. खा. राऊत यांनी प्रशालेने अल्पावधीत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. आ. वैभव नाईक आणि संदेश पारक यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरिभाऊ भिसे तर आभार संस्थेचे चेअरमन डॉ. विद्याधर तायशेटे यांनी मानले. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.