Thu, Feb 21, 2019 00:58होमपेज › Konkan › मालवण : बोट उलटून बहिण, भावाचा दुर्देवी मृत्‍यू

मालवण : बोट उलटून बहिण, भावाचा दुर्देवी मृत्‍यू

Published On: Mar 11 2018 5:29PM | Last Updated: Mar 11 2018 5:29PMकणकवली : वार्ताहर

मालवण तालुक्यातील गोठणे येथील नदीच्या डोहात बोटींग करत असताना अचानक बोट पलटून झालेल्‍या अपघातात बहिण, भावाचा दुर्दवी मृत्‍यू झाला. तर एक बहीणीला पोहता येत असल्‍याने  सुदैवाने ती बचावली. ही दुर्घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गडनदी पात्रात गोठणे आणि किर्लोस दरम्यान घडली. 

सुवर्णा दशरथ आचरेकर (वय 25) व तिचा भाऊ आकाश आचरेकर (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे सकाळी अकराच्या सुमारास गडनदीमध्ये कपडे धुण्यासाठी आली होती. या पात्रात उभी असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्‍याने बोट पलटी झाल्याने दोन भावंडे डोहात बुडाली. दिपाली हिला पोहता येत असल्याने ती बचावली. तिने एका झुडपाचा आधार घेत तेथे शेरडे राखणदार असलेल्या व्यक्तीच्या मदतीने स्वतःचा जीव वाचविला. मात्र ईतर दोघे या नदित बुडाले.