Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Konkan › भीमा- कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्गात पडसाद

भीमा- कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्गात पडसाद

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:34PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव  प्रकरणाचे पडसाद बुधवारी सिंधुदुर्गातही उमटले. तेथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत बुधवारी कणकवलीत भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आणि आंबेडकरी अनुयायी यांनी एकत्र येत कणकवलीत भव्य मोर्चा काढला. यावेळी  नव्या पेशवाईचा व हल्ल्याचा निषेध करत महामार्गावर पटवर्धन चौैकात सुमारे अर्धा तास रास्ता रोकोही केले. यावेळी विविध संघटनांच्या नेत्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये नवी मनूवादी प्रवृत्ती पुन्हा डोके  वर काढत असेल तर त्या प्रवृत्तीला उलथवून टाकण्याचे काम तमाम भीमसैनिक करतील, असा इशाराही दिला. 

बुधवारी दुपारी 12 वा. सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. कणकवली सिद्धार्थनगर येथून पटकीदेवी बाजारपेठ मार्गे हा मोर्चा पटवर्धन चौैकात आला. तेथून महामार्गाने प्रांत कार्यालयाकडे हा मोर्चा येऊन तेथे सभेत रूपांतर करण्यात आले. या मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डांमरेकर, सत्यशोधक संघटनेचे सुदीप कांबळे, अंकुश कदम, संदीप कदम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, जिल्हा सचिव विलास वळंजू, प्रा. विनोदसिंह पाटील, बामसेफ संघटनेचे सूर्यकांत कदम, प्रा. संतोष रायबोले, कणकवली महाल बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष डी.डी.कदम, विठ्ठल कदम, मनोहर कदम, रश्मी पडेलकर, विनोद जाधव, समता प्रतिष्ठानचे अमोल कांबळे, अनंत कांबळे, कणकवली तालुका चर्मकार संघटनेचे अध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनंत जाधव, जिल्हा संघटक प्रभाकर चव्हाण, कोकण उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, मिलींद जाधव, प्रकाश वाघेरकर आदी या मोर्चात सहभागी झाले होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो अशा घोषणा देत या मोर्चेकर्‍यांनी भीमा-कोरेगाव येथील हल्ला हा भ्याड हल्ला असून   सरकारचा निषेध केला. मुंबई-गोवा मार्गावर पटवर्धन चौकात आंदोलनकर्त्यांनी सुमारे 20 मिनिटे  ठिय्या आंदोलन केले.