Tue, Nov 20, 2018 17:19



होमपेज › Konkan › भीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद

भीमा कोरगाव प्रकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:21PM

बुकमार्क करा




कणकवली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव  प्रकरणाचे पडसाद बुधवारी सिंधुदुर्गातही उमटले. तेथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत बुधवारी कणकवलीत भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आणि आंबेडकरी अनुयायी यांनी एकत्र येत कणकवलीत  मोर्चा काढला. यावेळी  नव्या पेशवाईचा व हल्ल्याचा निषेध करत महामार्गावर पटवर्धन चौैकात सुमारे अर्धा तास रास्ता रोकोही केले. यावेळी विविध संघटनांच्या नेत्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये नवी मनूवादी प्रवृत्ती पुन्हा डोके  वर काढत असेल तर त्या प्रवृत्तीला उलथवून टाकण्याचे काम तमाम भीमसैनिक करतील, असा इशाराही दिला. 

बुधवारी दुपारी 12 वा. सुमारास या मोर्चास प्रारंभ झाला. कणकवली सिद्धार्थनगर येथून पटकीदेवी बाजारपेठ मार्गे हा मोर्चा पटवर्धन चौैकात आला. तेथून महामार्गाने प्रांत कार्यालयाकडे हा मोर्चा येऊन तेथे सभेत रूपांतर करण्यात आले. या मोर्चात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डांमरेकर, सत्यशोधक संघटनेचे सुदीप कांबळे, अंकुश कदम, संदीप कदम आदी सहभागी होते.