Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कै. श्रीधर नाईक यांचे विचार आजही जिवंत : खा. राऊत 

कै. श्रीधर नाईक यांचे विचार आजही जिवंत : खा. राऊत 

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 9:56PMकणकवली : प्रतिनिधी 

कै.श्रीधर नाईक हे दानशूर आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून तरुणांची एक फळी निर्माण केली होती. ते जनमाणसात इतके लोकप्रिय होते कि आजही सिंधुदुर्गात त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते.  अपप्रवृत्तींनी त्यांची हत्या केली असली तरी त्यांचे  विचार मात्र अजूनही जिवंत आहेत. ते विचार जोपासून आ. वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक तसेच नाईक कुटुंबियांनी सामाजिक कामाचा वारसा कायम ठेवला आहे, असे प्रतिपादन खा. विनायक राऊत यांनी श्रीधर नाईक यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमात बोलताना  केले. 

कै .श्रीधर नाईक यांचा 27 वा स्मृतिदिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. सकाळी नरडवे रोड  येथील कै श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास खा. विनायक राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील श्रीधर प्रेमींनी मोठी गर्दी केली. त्यानंतर  कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. 

यावेळी आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हा  संपर्क प्रमुख  अरुण   दुधवडकर, युवानेते संदेश पारकर, राजू फाटक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,  नगरसेवक सुशांत नाईक, सतीश नाईक, संकेत नाईक, शैलेश भोगले, सुनील पारकर,मधु हर्णे, प्रमोद मसुरकर, नासिर खान, महेश देसाई सुजित जाधव, अजित काणेकर, प्रा. दिवाकर मुरकर, डॉ.चंद्रकांत राणे, डॉ.तुळशीराम रावराणेसौ. तेजल लिंग्रज, सौ.प्रतीक्षा साटम, सौ. साक्षी आमडोस्कर आदी उपस्थित होते. 

अरुण दूधवडकर म्हणाले, ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’  याचे उत्तम  उदाहरण कै.श्रीधर नाईक हे आहेत. गेली 27  वर्षे नाईक कुटुंबीय त्यांचा स्मृतीदिन साजरा करत आहेत. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण, चित्रकला, निबंध स्पर्धा, रक्तदान असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, हे कौतुकास्पद आहे असे सांगत त्यांना अभिप्रेत समाजसेवा करणे हीच श्रध्दांजली 
असल्याचे श्री. दुधवडकर यांनी सांगितले.

आ.वैभव नाईक म्हणाले,कै.श्रीधर नाईक यांनी आपल्याला मिळणार्‍या उत्पन्नांतील काही वाटा समाजाच्या हितासाठी खर्ची करत एक युवा वर्गाची ताकद उभी केली होती.त्यांच्या कामाची दखल सर्वांनीच घेतली होती. त्यांचे हे समाजव्रताचे कार्य असेच अविरत चालू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तरुण वर्गाला स्फूर्ती यावी या उद्देशाने विविध सामाजिक कार्यक्रम घेत असल्याचे सांगत श्रीधर नाईक यांना अभिप्रेत असलेले काम यापुढेही करू  असा विश्‍वास आ. नाईक यांनी व्यक्त केला. 

युवा नेते संदेश पारकर 

म्हणाले, राजकारणात अनेक बदल घडत असतात.श्रीधर नाईक व कै.विजय नाईक  यांनी त्यावेळी राजकारणात बदल घडवत भक्कम संघटना निर्माण केली होती. त्यांचा हा अश्‍वमेघ थांबवावा या हेतूने काहींनी श्रीधर नाईक यांची हत्या केली. मात्र त्यांचे विचार चिरंतर आहेत. त्यांच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख एका कुटुंबाचे नसून ते समाजाचे दुःख मानून या वृत्तीला सर्वांनीच ठेचले पाहिजे असे सांगत संदेश पारकर यांनी श्रीधर नाईक यांच्या स्मृतीला उजाळा दिला. श्रीधर नाईक फाऊंडेशनतर्फे स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला, निबंध स्पर्धामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या  हस्ते रोख बक्षिसे, प्रशस्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीधर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.