Sat, Jul 20, 2019 12:59होमपेज › Konkan › कनेडीत बारावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

कनेडीत बारावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 9:41PMकणकवली : वार्ताहर

कनेडी येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या स्वरूपा दिलीप कदम (वय 18) या विद्यार्थिनीने गुरुवारी दुपारी कनेडी येथील घरी गळफास लावून आत्महत्या केली. घरात कुणीही नसल्याची संधी साधत तिने किचन रूममधील लोखंडी बारला ओढणीने स्वतःला गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

कुडाळ तालुक्यातील भरणी गावातील दिलीप कदम हे कुटुंबीयांसमवेत कनेडी चर्च रोड येथे राहतात. दिलीप कदम हे जि.प.च्या कनेडी बाजारपेठ प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची धाकटी मुलगी असलेली स्वरूपा ही कनेडी ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेत बारावीच्या वर्गात शिकत होती. कॉलेजमधून दुपारी घरी आलेल्या स्वरूपा हिने वडिलांना जेवण वाढले. जेवण झाल्यानंतर ते घरातून शाळेत निघून गेले, तर आई ही भरणी येथील घरी शेतीच्या कामासाठी गेली होती. घरात कुणीही नसल्याची संधी साधत स्वरूपा हिने किचन रूममधील लोखंडी बारला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. भरणी येथून दुपारी 3.30 च्या सुमारास कनेडी येथील घरी आलेल्या आईने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आईने दरवाजाजवळील खिडकीतून हात घालत आतील कडी काढली व घरात प्रवेश केला. घरात गेल्यानंतर तिला स्वरूपा गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिक धावून आले. तिने दुपारी 2 ते 3.30 च्या दरम्याने आत्महत्या केली. सायंकाळी तिचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. स्वरूपा हिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर जि.प. चे माजी अध्यक्ष संदेश सावंत, कनेडी विद्यालयाचे शिक्षक सुमन दळवी, बयाजी बुराण, प्रसाद मसुरकर, देवेंद्र सावंत तसेच प्राथमिक शिक्षक व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर स्वरूपा हिच्यावर शुक्रवारी सकाळी भरणी येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आत्महत्या केल्यानंतर स्वरूपा हिचा मोबाईल तिच्यासमोर पडलेला होता. तिने आत्महत्या का केली?  हे त्या मोबाईलवरूनच समजण्याची शक्यता आहे. तिच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.