Wed, Jan 23, 2019 00:28होमपेज › Konkan › कणकवली नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर भाजपचे उमेदवार

कणकवली नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर भाजपचे उमेदवार

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:46PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अखेर भाजपचे उमेदवार म्हणून कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, युवा नेते संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा भाजपचे नेते राज्यमंंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. 

या निवडणुकीत युतीबाबत शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत, शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेऊन नगरसेवकपदासाठी उमेदवारांची नावे कोअर कमिटीतर्फे घोषित केली जातील, असेही ना. चव्हाण यांनी सांगितले.

 संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतीच्या 2003 साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी निवडून आले होते. आमच्या विनंतीला मान ः चव्हाण/4