Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Konkan › शिवसेनेने फुंकले कणकवलीचे रणशिंग (व्‍हिडिओ)

शिवसेनेने फुंकले कणकवलीचे रणशिंग (व्‍हिडिओ)

Published On: Mar 10 2018 4:16PM | Last Updated: Mar 10 2018 5:51PMकणकवली : शहर वार्ताहर

शिवसेनेने कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. खासदार राऊत यांनी यावेळी प्रचाराचा नाराळ फोडला.

शिवसेना स्वबळावर कणकवली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडणुकीत राणे यांनी विजयाची वल्गना करू नये. स्वाभिमान पक्षाच्या इतिहासातील पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला धूळ चारणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना नेते कणकवलीत प्रचारासाठी होणार दाखल होणार आहेत.जनतेचा विरोध असल्याने नाणार रिफायनरी  प्रकल्पाचा करारनामा होऊ दिला नाही. तरीही सरकारने प्रकल्प लादल्यास शिवसेने आपली भूमिका स्‍पष्ट करणार आहे. त्यासाठी मंत्रिपद सोडावे लागले तरी चालेल अशी सुभाष देसाई यांनी गर्जना केली आहे. आमदार वैभव नाईक, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, शैलेश भोगले, सुशांत नाईक, हर्षद गावडे, शेखर राणे, स्नेहा तेंडोलकर, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने होते उपस्थित.