Wed, Jan 22, 2020 23:09होमपेज › Konkan › कणकवलीत महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मूक मोर्चा 

कणकवलीत महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा मूक मोर्चा 

Published On: Dec 07 2017 5:08PM | Last Updated: Dec 07 2017 5:08PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

चौपदरीकरणात बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्ताच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाने देऊ केलेला जमीन मोबदला अत्यंत तुटपुंजा  असून शहरात लागू असलेल्या रेडिरेकनर प्रमाणेसुद्धा नाही. त्यामुळे असंतुष्ट असलेल्या कणकवली प्रकल्पग्रस्तानी गुरुवारी कणकवली शंभर टक्के बंद ठेवत, तसेच काळयाफिती बांधून प्रांत कार्यालयावर  मूक मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. 

या बंदला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरात शुकशुकाट दिसत होता. हा मोर्चा भालचंद्र महाराज संस्थान येथून पटकीदेवी मार्गे बाजारपेठेतून पटवर्धन चौक ते प्रांत कार्यालयपर्यंत काढण्यात आला. शिस्तबद्ध काढण्यात आलेला मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्च्यातून प्रकल्पग्रस्त व शहरवासियांची एकजूट दिसून आली. 
कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यापोटी प्रशासनाने तुटपुंजी रक्कम देण्याचे ठरविले़. २०१३ च्या मुल्यांकनानुसार दिलेला भाव हा प्रकल्पग्रस्तांसाठी अन्यायकारक आहे़. २५ वर्षांपेक्षा जास्त भाडेकरू तर काहीजण मालकी हक्क असलेले प्रकल्पग्रस्त अद्यापही नोटीसांपासून वंचित आहेत. मुल्यांकन करताना ना नगरपंचायत, ना मालकांना प्रशासनाने विश्वासात घेतले नाही़. तसेच विविध नेत्यांना, मंत्र्यांना भेटूनही अद्यापही कोणतीही हालचाल प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने झालेली नाही़. ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच प्रशासनाला जाग येण्यासाठी हा शांततेत  मोर्चा काढण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांचा शासनाने अंत पाहू नये. मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचे असेल. असे प्रकल्पग्रस्तांच्यावतीने उदय वरवडेकर यांनी सांगितले.