Thu, Jul 18, 2019 00:49होमपेज › Konkan › कणकवलीत 48 उपसरपंच बिनविरोध : 8 जागी निवडणूक

कणकवलीत 48 उपसरपंच बिनविरोध : 8 जागी निवडणूक

Published On: Dec 30 2017 12:47AM | Last Updated: Dec 29 2017 10:49PM

बुकमार्क करा
कणकवली : वार्ताहर

कणकवली तालुक्यातील  56 पैकी 48 ग्रा. पं. च्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर 8 ग्रा. पं. साठी मतदान घेऊन उपसरपंच निवडण्यात आले. फोंडाघाट व कलमठ  ग्रा. पं. मध्ये उमेदवारांनी माघार घेतल्याने उपसरपंच बिनविरोध निवडण्यात आले. तालुक्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने याही निवडणूकीत आपले वर्चस्व राखले आहे. तर काही महत्त्वाच्या ग्रा. पं. वर शिवसेना, भाजपचे उपसरपंच निवडून आले आहेत. 

कणकवली तालुक्यातील 58 ग्रा. पं. ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यातील 56 ग्रा. पं. ची मुदत 29 डिसेंबर रोजी संपत असल्याने नवीन सरपंचांनी पदभार स्विकारला. त्याचवेळी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. मतदान घेऊन उपसरपंच निवडण्यात आलेल्या ग्रा. पं. मध्ये साकेडी, तळेरे, खारेपाटण, ओसरगांव, तिवरे, कोळोशी,कळसुली व शिवडाव यांचा समावेश आहे. साकेडी मध्ये महम्मद जहुर उस्मान शेख  हे 4  मतांनी विजयी तर विरोधी किशोेरी कृष्णा तेली यांना 3 मते मिळाली. तळेरेत दिपक विनायक नांदसकर 7 मतांनी विजयी तर उदय  दत्ताराम तळेकर यांना 1 मत व 1 सदस्य गैरहजर राहिले. खारेपाटण - इस्माईल अकादीर मुकादम 6 मतांनी विजयी व उज्वला विरेंद्र चिके यांना 5 मते मिळाली. तर शंकर राऊत यांनी आपला अर्ज मागे घेतला. ओसरगाव - मुरलीधर कृष्णा परब 5 मतांनी विजयी तर हेमंतकुमार धर्माजी तांबे यांना 4 मते मिळाली. तिवरे-रविंद्र सिताराम आंबेरकर 4 मतांनी विजयी तर प्रियांका पुरूषोत्तम धुरी 2 मते, कोळोशी- संजय हरिश्‍चंद्र पेडणेकर 4 विजयी व सानिका सुभाष इंदप 3, कळसुली- अंकुश वासुदेव तेली 7 विजयी तर सचिन पुनाजी पारधिये 4, शिवडाव - लवू सीताराम वाके 6 विजयी तर दीपक पांडुरंग कोरगांवकर 3 मते मिळाली. 

बिनविरोध निवडून आलेल्या उपसरपंचांमध्ये फोंडाघाट - सुदेश वसंत लाड, कलमठ - वैदेही विलास गुडेकर, हरकुळ बुद्रुक- चंद्रकांत नामदेव परब, नाटळ- दत्ताराम खरात, सांगवे - रमेश ज्ञानदेव म्हापणकर, वरवडे - अमोल गोविंद बोंद्रे, आशिये- संदीप दिगंबर जाधव, आयनल - लक्ष्मीकांत गोविंद पेडणेकर, बिडवाडी- आनंदराव अमृतराव साटम, बोर्डवे - आसिफ अब्दूल रझाक शेख, कासरल-मिलींद हरिश्‍चंद्र सावंत, सातरल-शंकर बाळकृष्ण मुळये, दिगवळे- लक्ष्मण भास्कर गावडे, कुंभवडे- रॉबर्ट मनवेल डिसोजा, घोणसरी - प्रसाद राणे, लोरे - नरेश धाकू गुरव, हुंबरट-मुश्ताक अमीर काझी, कसवण-तळवडे- गोपिनाथ वसंत सावंत, करूळ-विनायक शिवराम गोमणे, साळिस्ते - शांताराम तुकाराम कांजीर,शिडवणे-दिपक जिवबा पाटणकर, हळवल-अरूण राऊळ, दारिस्ते-संजय वसंत गावकर, तरंदळे-निलेश अशोक घाडीगावकर, नागवे-आरोही दत्तात्रय सांगवेकर, भरणी -प्रकाश सखाराम घाडी, कुरंगवणे-वेर्ले - संतो प्रकाश ब्रम्हदंडे, ओझरम-सुनिल हरिश्‍चंद्र राणे, पियाळी-बाळकृष्ण मधुकर सावंत, नरडवे-सुरेश ढवळ, शिरवल-पांडुरंग एकनाथ सावंत, डामरे-संतोष नरहरी कानडे, हरकुळ खुर्द-संजय रावले, सावडाव-दत्ता काटे, नांदगाव-निरज मोर्ये, असलदे-संतोष परब, दारूम-भरत चव्हाण, कासार्डे-पुजा जाधव, वाघेरी-गितांजली गुरव, करंजे-राजन श्रीकांत चिंदरकर, नडगिवे-भावेश शरद कर्ले, शेर्पे-विजय कांबळे, वायंगणी-संदीप सावंत, चिंचवली-अनिल पेडणेकर, वारगांव-नारायण शेट्ये, पिसेकामते -अनिल गावकर, वागदे -संतोष गावडे तर माईण उपसरपंचपदी अनिल दिनकर सुखटणकर बिनविरोध निवडून आले.