होमपेज › Konkan › ‘त्या’ मारहाणीशी माझा संबंध नाही : सतीश सावंत

‘त्या’ मारहाणीशी माझा संबंध नाही : सतीश सावंत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

रस्त्यांची कामे दर्जेदार करून घेणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. कामाविषयी तक्रारी देवून खंडणी उकळण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. त्या मारहाणीशी माझा कोणताही संबंध नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्याला राजकीय रंग देण्याऐवजी खंडणी बहाद्दर कार्यकर्त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावा. 25 वर्षाच्या कारकिर्दीत आपण कधीही विकासकामांच्या दर्जाविषयी तडजोड केलेली नाही, असे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. 

सार्वजनिक बांधकाम कणकवली उपविभागात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सतीश सावंत यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना सतीश सावंत म्हणाले, त्या घटनेला न.पं. निवडणुकीचा राजकीय रंग देण्याऐवजी जठार यांनी नागवे गावात जावून त्या कार्यकर्त्यांविषयी माहिती घ्यावी. मागील वर्षीही याच कार्यकर्त्यांकडून रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते.

कामांचा दर्जा राखणे ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांचीच जबाबदारी आहे. मारहाणीचा प्रकार हा खंडणीच्या मागणीतून झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते कामावर असताना दर्जेदार काम करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. स्वाभिमानमधील कुरघोडीतून मारहाणीचे षडयंत्र या जठार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सावंत म्हणाले, ती प्रवृत्ती जठार यांच्याच पक्षात आहे. नागवे प्रकरणाशी स्वाभिमान पक्ष अथवा न.पं. निवडणुकीचा संबंध नाही. राजकीय रंग देण्यासाठीच जठार यांच्यासह संदेश पारकर, अतुल रावराणे हे पोलिस स्टेशनला जावून दबाव आणत होते. मात्र, पोलिसांनी नि:पक्षपातीपणे हे प्रकरण हाताळल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.
 

 

 

tags ; kankavali,news,PublicConstruction,kankavali, Subdivision, Hitting,


  •