Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Konkan › कळंबस्तेत घरफोडी;  2 लाखांचा ऐवज लंपास

कळंबस्तेत घरफोडी;  2 लाखांचा ऐवज लंपास

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PMचिपळूण : खास प्रतिनिधी
शहरालगत कळंबस्ते येथील दोन सदनिका फोडून चोरट्यांनी सोमवारी रात्री दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला आहे. या घटनांमध्ये सहा तोळे सोने आणि 60 हजार रुपयांची चोरी झाली आहे. याबाबत शुभांगी राकेश कदम यांनी चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  मोरवणे या गावातील साईप्रसाद इमारतीमधील सदनिका फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. चोरीच्या या घटनेत सदनिकेची कडी तोडून कपाटातील 6 तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख 50 हजार रुपये लांबवण्यात आले आहेत. तसेच राकेश कदम यांचा भाऊ रूपेश कदम यांचीही सदनिका फोडून त्यातील सहा हजार रुपये चोरट्यांनी लांबवले.