Mon, May 20, 2019 08:08होमपेज › Konkan › ठाणे : कठीण चढाई असलेला कलावंतीण दुर्गावर शिवप्रेमींची गर्दी (व्‍हिडिओ)

ठाणे : कठीण चढाई असलेला कलावंतीण दुर्गावर शिवप्रेमींची गर्दी (व्‍हिडिओ)

Published On: Feb 19 2018 11:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:21AMठाणे : अमोल कदम

पनवेलपासून काही अंतरावर असलेला कलावंतीण दुर्ग हा पर्यंटकाकरिता ट्रेकिंग करण्यासाठी आवडता असा किल्ला मानला जातो. पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत एक डोंगर मध्यंतराचा भाग सोडला की पुढे कलावंतीण दुर्ग लागतो. त्याच्या बाजूलाच प्रबळगड आहे.

गिर्यारोहकांकरिता हा कलावंती दुर्ग चढाई करण्याकरिता खूप आकर्षक असून ट्रेकर्स, गिर्यारोहक हा कठीण चढाई असलेला किल्ल्यावर्ती सुट्टी दिवशी गर्दी करतात. त्यामुळे याही शिवजयंतीला शिवप्रेमींची राज्यभरातून गडावर गर्दी होत असते.

गडावर पोहोचण्याचा मार्ग :

हा गड मुंबई-पुणे महामार्गावरून दिसतो. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन जाताना शेडूंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो. तेथे शेडूंग फाटा लागतो. पनवेलावरून एसटीने किंवा सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. सहा आसनी रिक्षाने १० लोकांचे साधारणत: २००-२५० रुपये द्यावे लागतात. दुसरा उपाय म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा आहे. प्रत्येकी १२ रुपये बसचे टिकीट आहे. बस किंवा रिक्षाने ठाकुरवाडीला आल्यावर प्रबल गडाच्या दिशेने पायी चालत जावे लागते. प्रबल गडाच्या लगतच्या भागाला लागून हा कलावंतीण दुर्ग असून संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता इतिहास काळात खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्ये करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, इर्शल गड, कर्नाळा किल्ला व समोर असणारे पनवेल शहर सहजपणे उंचावरून दिसते. त्यामुळे या गडावर गिर्यारोह मोठ्या संख्येने भेट देत असतात.आज शिवजयंती असल्यामुळे या प्रबळगड, कलावंतीण दुर्गावर शिवप्रेमींची शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोठी गर्दी होत आहे.