होमपेज › Konkan › राठिवडे येथे आग लागून भात गंजीसह काजू बागांचे नुकसान

राठिवडे येथे आग लागून भात गंजीसह काजू बागांचे नुकसान

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 10:14PMविरण : वार्ताहर

राठिवडे मेस्त्रीवाडी येथील शेतकरी विश्राम मेस्त्री यांच्या लिंगेश्‍वर मंदिर परिसरातील शेतमळ्यात ठेवलेल्या भात गंजीला बुधवारी दु. 2 च्या सुमारास आग लागून मेस्त्री यांचे मोठे नुकसान झाले. तसेच नजीकच असलेल्या शेतकरी विलास धुरी यांच्या काजू बागांचे आगीत मोठे नुकसान झाले. येथीलच शेतकरी यशवंत धुरी यांना आग लागल्याची दिसल्यावर त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी सोसाट्याच्या वार्‍याने आग भडकल्याने विलास मेस्त्री यांचे भात गंजीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

राठिवडे ग्रामसेविका एस. पी. सडविलकर, सरपंच मंजुषा धुरी,  उपसरपंच स्वप्नील मेस्त्री, ग्रा. पं. सदस्या वैशाली धुरी, आरती मेस्त्री यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी माजी सरपंच शोभा पांचाळ, ग्रामस्थ सुभाष धुरी, गोविंद मेस्त्री, रघुवीर धुरी, राजू राठिवडेकर, सचिन धुरी, किशोर पाताडे, दीपक धुरी, ग्रा.पं. कर्मचारी उत्तम धुरी यांनी प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येऊ शकली नाही. या आगीत गवत गंजीसह काजू बागांचे सुमारे दीड ते दोन लाख रू. चे नुकसान झाले 
आहे.