Wed, May 22, 2019 16:20होमपेज › Konkan › असलदे येथे कदंबा बसला ट्रेलरची धडक

असलदे येथे कदंबा बसला ट्रेलरची धडक

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:10PMनांदगाव : वार्ताहर

मुंबई - गोवा महामार्गावर असलदे पियाळी पूलावर गोवा राज्य परिवहन मंडळाची कदंबा बसला मालवाहू ट्रेलरने विरूद्ध बाजूला जात जोरदार धडक दिली.  सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र  दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर तब्बल दोन तास महामार्ग ठप्प झाली होती. बुधवारी पहाटे 5.15 वा. हा अपघात घडला.

सध्या मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण  काम सुरू आहे. यामुळे वाहनांचा वेग कमी आहे. मालवाहू ट्रेलर सुसाट वेगाने येताना पाहून सोलापूर- वास्को या कदंबाच्या चालकांने बस असलदे पियाळी पूलावर बाजूला घेतली. मात्र ट्रेलर विरूद्ध बाजूला येऊन कंदबा बसला धडकला. या अपघातात दोनही वाहने महामार्गावर  अडकून पडल्यामुळे  महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. 
या अपघातानंतर ट्रेलर चालक  ट्रेलर जागीच टाकून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच कासार्डे आऊटपोस्टचे एस. बी. सावंत,गणेश भोवड,शिरीष कांबळे यांनी  पाहणी केली. महामार्ग पोलीस मंगेश सुर्वे, श्री. मराठे हे सुद्धा दाखल झाले. तब्बल दोन तास अपघातग्रस्त वाहने पूलावर अडकून पडल्याने दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यानंतर चौपदरीकरणाचे काम करणार्‍या जेसीबीच्या सहाय्याने  वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली.