Fri, Apr 26, 2019 19:46होमपेज › Konkan › ऊस उत्पादनवाढीसाठी एकत्रितप्रयत्नांची गरज : सावंत

ऊस उत्पादनवाढीसाठी एकत्रितप्रयत्नांची गरज : सावंत

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:03AM

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

कणकवली, वैभववाडी तालुक्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.  लागवडीचे क्षेत्र वाढत असताना पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस लागवडीचे तंत्र आत्मसात करत एकरी ऊसाचे उत्पादन कसे वाढेल यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. ऊसाचे एकरी उत्पादन वाढल्यास शेतकरी आर्थिक सक्षम होणार आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञान, नवीन जातींची लागवड यासारखे प्रयोग करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

सिंधुदुर्ग बँक व कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्यावतीने फोंडाघाट येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. बीव्हीजीचे भालचंद्र पोळ, वैभव गोडसे, वाघेरी सरपंच संतोष राणे, वाघेरी सोसायटी चेअरमन महेंद्र राणे, पद्मश्री डी.वाय. पाटील साखर कारखान्याचे सुनील पाटील, बँक स्थायी अधिकारी एस. एम.यादव, एच. सी. अहिरे, विकास अधिकारी श्री. गवाणकर, श्री. प्रभू, राजीव सावंत, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, कणकवली, वैभववाडी तालुक्यामध्ये ऊसाचे उत्पादन 1 लाख 10 हजार टनापर्यंत पोहोचले आहे. येत्या काळात ऊसाचे एकरी उत्पादन कसे वाढेल यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये एकरी 60 ते 100 टनापर्यंत ऊस उत्पादन घेतले जाते. तेथील शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान आत्मसात करत येथील शेतकर्‍यांनी प्रयोगशीलता जोपासत  ऊसाचे एकरी उत्पादन  वाढविण्यासाठीचे प्रयत्न करावेत. आंबोली येथे ऊस संशोधन केंद्र असून येथील शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन व्हावे यासाठी भेट कार्यक्रम आयोजित करण्यात यावा,  असे सांगितले. ऊस लागवडीतील नवीन तंत्रज्ञान व एकरी उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती बीव्हीजीचे भालचंद्र पोळ यांनी 
दिली.