Fri, Mar 22, 2019 01:43
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘जनसुविधे’तून पालटतोय गावांचा चेहरामोहरा!

‘जनसुविधे’तून पालटतोय गावांचा चेहरामोहरा!

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात आलेल्या जनसुविधा योजनेच्या कामांची व्याप्ती वाढवण्यात आली असून सन 2017-18 वर्षी जिल्ह्यातील 399 कामांना 17 कोटी 65 लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. यामुळे या योजनेतून जिल्ह्यातील गावांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.

दहन-दफनभूमी - इतर कार्यक्रम ही जिल्हास्तरीय योजना शासनामार्फत राबविण्यात येत होती. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील ज्या गावात दहन- दफनभूमीसाठी ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध नसेल अशा गावांच्या बाबतीत खासगी जमीन संपादित करण्यासाठी केवळ भू-संपादनाचा खर्च भागविण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येत होते. परंतु, ग्रामीण भागात दहन-दफन भूमीची मागणी व यासाठी लागणार्‍या इतर अनुषंगिक सोयी-सुविधांबाबत ग्रामपंचायतींच्या मागण्या शासनास प्राप्त होत होत्या. 

त्यामुळे ही योजना विस्तारित करून सन 2010-11 या आर्थिक वर्षापासून ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान  ही नवीन जिल्हा वार्षिक योजना राज्यात सुरू केली. 
या योजनेमध्ये दहन, दफन भूसंपादन चबुतर्‍याचे व शेडचे बांधकाम, पोहोच रस्ता, गरजेनुसार कुंपण व भिंती घालून जागेची सुरक्षितता साधणे, दहन व दफनभूमीत विद्युतीकरण, आवश्यकतेनुसार विद्युतवाहिनी व सुधारित शवदाहिनी व्यवस्था, पाण्याची सोय, स्मशान घाट, नदीघाट बांधकाम, जमीन सपाटीकरण व तळफरशी स्मृती उद्यान, इतर कामांचा समावेश आहे.