Mon, May 20, 2019 10:09होमपेज › Konkan › ‘जलयुक्त शिवार’ जोमात

‘जलयुक्त शिवार’ जोमात

Published On: Jan 29 2018 11:23PM | Last Updated: Jan 29 2018 11:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्यातील जलयुक्त शिवार अभियान जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी अर्थ मुव्हर्स यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना सुरु करण्याबाबतच  प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.  राज्यात जलयुक्त शिवार अभियान जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी उत्पादन संस्था, नोंदणीकृत शेतकरी गट,  बेरोजगारांच्या सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी उत्पादन संस्था, नोंदणीकृत शेतकरी गट,  बेरोजगारांच्या सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था यांना उत्खनन यंत्र सामुग्री अर्थ मुव्हर्स खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन देण्यात येणार्‍या कर्जावरील व्याजाच  दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी 31 मार्च 2018 पर्यंत राहील. लाभार्थी यांच्याकडे स्वत:ची मालकीची यंत्रसामुग्री नसावी. तसेच स्वत: चा हिस्सा किमान 20 टक्के रक्कम उभारणे आवश्यक आहे.  

लाभार्थी निवडीचा प्राधान्य क्रम खालील प्रमाणे राहील:- सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगारांच्या सहकारी संस्था, नोंदणीकृत गट शेती, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असा राहणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीची निवड करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी तथा जिल्हा मृदसंधारण अधिकारी, रत्नागिरी अध्यक्ष. कार्यकारी अभियंता, लघुसिंचन जलसंधारण तथा जिल्हा संधारण अधिकारी,रत्नागिरी सदस्य. जिल्हा उपनिबंधक, सहकारी ग़ग़संस्था, रत्नागिरी सदस्य सचिव यांची समिती नेमण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी  31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज हीींिीं://शाश.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप  या वेबसाईटवर दाखल करावेत व त्यांनतर प्राप्त ऑनलाईन अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये करण्यात येईल आणि पात्र प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास सादर करण्यात येतील. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक बी. एस. माळी यांनी केले आहे.