Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Konkan › ‘जैतापूर’विरोधातील सभा पोलिस बंदोबस्तात

‘जैतापूर’विरोधातील सभा पोलिस बंदोबस्तात

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 10:28PMजैतापूर : वार्ताहर

फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर  शनिवारी मीठगव्हाणे येथे झालेल्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी सभेला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारली असतानाही राजापूर तालुक्यातील नाटे येथील हुजरा चौकात अत्यंत चोख पोलिस बंदोबस्तात ही अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी सभा घेण्यात आली. सभेदरम्यान पोलिसी खबरे जागो जागी पाहायला मिळत होते. या सभेमुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आजही विरोध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या भारत भेटीच्या पाश्‍वर्र्भूमीवर  होणार्‍या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पविरोधी सभेला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारली असतानाही नाटे येथे ही सभा घेण्यात आली. ग्रामस्थांनी या प्रकल्पाला  विरोध दर्शविला आहे.