Mon, Apr 22, 2019 04:01होमपेज › Konkan › राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे 

राज्यात इंटरनॅशनल बोर्ड स्थापन करणार : ना. तावडे 

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 05 2018 12:04AM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

शिक्षणाचा दर्जा व  गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रगत महाराष्ट्रासह सेमी इंग्रजी, कंपनी शाळा सारखे अनेक शासन निर्णयातून  प्रयोग केले. त्यात प्रगत महाराष्ट्र  उपक्रमात  राज्य सोळाव्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहे. राज्यातील  शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात इंटरनॅशनल  बोर्ड स्थापन करण्यशा बरोबरच आंतरराष्ट्रीय  दर्जाच्या शंभर शाळा सुरू करण्याचा निर्णय  घेण्यात आल्याच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे   सोळावे त्रैवार्षिक  महाअधिवेशन  सिंधुदुर्गनगरी येथे झाले. या महाअधिवेशनाचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते  पार पडले.  माजी मुख्यमंत्री  नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, राजाध्यक्ष काळ बोरसे पाटील,  ग्रामविकास राज्यमंत्री हादाजी भुसे, आ. वैभव नाईक, जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई,  कणकवली पं. स. सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम,  जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आ. राजन तेली, अतुल रावराणे, संदेश पारकर,  अतुल काळसेकर,  राज्यसरचिटणीस  उदय शिंदे, विजय कोंडे, पृथ्वाराज  देशमुख,  ओरोस सरपंच प्रिती देसाई, नागेंद्र परब, नाना जोशी, विश्‍वनाथ मिरजकर, चंद्रकांत अणावकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, सरचिटणीस  चंद्रसेन पाताडे,  कोकण विभाग प्रमुख नामदेव जांभवडेकर, माजी अध्यक्ष राजन कोरगांवकर, सुरेखा कदम, आबा शिंपी, सावळाराम अणावकर यांसह सर्व जिल्ह्याचे  जिल्हाध्यक्ष, शिक्षक, महिला प्रतिनिधी लाखो संख्येने उपस्थित होते.  उपस्थितांचे स्वागत राजाध्यक्ष काळू बोरसे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन  राजेश कदम, सचिन  मदने यांनी केले तर प्रास्ताविक  राजाध्यक्ष  काळू बोरसे पाटील यांनी केले.

 ना. विनोद तावडे म्हणाले, शिक्षण विषयक धोरणात्मक निर्णय बदलाने प्रत्येक शाळेत शिक्षणमंत्री समजले. विद्यार्थी रोज शाळेत यावा यासाठी  विविध शैक्षणिक प्रयोग  करताना व चुका पुसताना त्रास होतोच.   इलर्निंगमध्ये राज्यातील 25 हजार जि. प. मराठी शाळा आल्या. हे आपले यश आहे.  राज्यातील 1400 शाळा बंद झाल्या, 12 हजार शाळा 20 पट संख्येच्या आहेत. आम्ही 10 पट संख्येचे 5 हजार 600 होत्या, त्याचे  सर्व्हेक्षण केले.  बुलढाणा- तांदुळवाडी शाळेत एकही विद्यार्थी नसलेल्या  शाळेत शिक्षिका  ठेवून  प्रयोग केल्याचे सांगत  तीन -चार  मुलांना  मोठ्या शाळेत  शिक्षकांसह पाठवून शाळाचे नुकसान  होणार नाही. कंपनी शाळाचा  निर्णयाबाबत  बोलताना  सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था  म्हणून काम करणार्‍या संस्थांना  विनाअनुदान  तत्वावर ना नफा ना तोटा तत्वावर  अशा शाळा चालवाव्यात , असे आवाहन त्यांनी केले.

 शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्‍त करणार ः ना. पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या,  शिक्षण आणि शिक्षण  यातील  शिक्षकांचे  प्रमुख प्रश्‍न काय असतात हे मी जवळून पाहिले आहे. विद्यार्थ्यांना  मोफत  ज्ञानदानाचे  पवित्र कार्य घडवितात. त्यांना आई, वडिलांसारखे मानाचे स्थान आहे.  मी जि. प. शाळेतच शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अवगुण समजतात. त्यांना दिशा देण्याचे  काम करतात. आपण शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे, ज्ञानदानाचे काम करावे, विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी  शैक्षणिक दर्जा सुधारण्याची जबाबदारी शिक्षकांची  आहे.  डिजीटल शाळा  होताना शिक्षकांना  एमएससीआयटी  शिक्षण महत्त्वाचे आहे. यापुढे  शौचालय, जनावरे व अन्य राष्ट्रीय कामे वगळून अन्य कामातून शिक्षकांना  मुक्‍त करण्याच्या  व पूर्ण ज्ञानदानातून विद्यार्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेत आहे. 

जिल्ह्यातील सर्व शाळे डिजिटल करणार ः दीपक केसरकर

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा  देशातील  पहिला पर्यटन, साक्षर, स्वच्छ, गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे. बदलत्या  संगणकीकरण करताना ज्ञानाजनामध्ये वाढ झाली. राज्यातील 55 हजार  पेक्षा जास्त  शाळा प्रगत तर 29 हजार शाळा राज्यात  डिजीटल झाल्या.  यात शिक्षकाचा महत्त्वाचा वाटा आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत 813 शाळा   डिजिटल झाल्या आहेत. उर्वरीत शंभर टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत.