Thu, Jun 27, 2019 02:36होमपेज › Konkan › जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ!

जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण आणि गोव्यामध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. यामुुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन अधिक वेगाने होऊन जमीन वेगाने कोरडी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथील आंबा पिकाला सिंचन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनीही आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.गेले महिनाभर रत्नागिरीसह कोकणामध्ये कोरडी हवा होती. मात्र, उत्तर- पूर्वेकडून वाहणार्‍या वार्‍यांमुळे काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. या वार्‍यांमुळे किनारपट्टीच्या परिसरातील हवामान उष्ण होऊन ते वाढू शकते.

उन्हाळ्यामध्ये तीव्र उष्णतेमुळे उष्माघात होऊ शकतो. तो जीवाला धोकादायकही ठरू शकतो. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्माघातामुळे शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतली किंवा निर्माण केली की हायपरथर्मिया होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनवण्यात आलेली लस्सी, आंबील, लिंबूपाणी, ताक इत्यादीचा वापर करण्यात यावा. अशक्‍तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम व चक्‍कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. शरीराचे तापमान वाढणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाचा त्रास होऊ लागल्यास घरगुती उपचाराबरोबरच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जावे. अनेक ठिकाणी उष्माघात वॉर्ड तयार ठेवले जात आहेत.

Tags : Konkan, konkan News, increasing, temperature, district, hot summer season, Goa, Konkan


  •