Sun, Sep 23, 2018 10:32होमपेज › Konkan › दक्षिण कोकणात आज, उद्या जोर‘धार’

दक्षिण कोकणात आज, उद्या जोर‘धार’

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:13PMपुणे : प्रतिनिधी 

मान्सूनची आगेकूच सुरूच आहे. अरबी समुद्रालगत दक्षिण कोकण ते केरळ किनारपट्टीदरम्यान समांतर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, यामुळे दि. 13 व दि. 14  जूनला दक्षिण कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

यादरम्यान किनारपट्टीवर ताशी 35 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, समुद्र खवळलेला राहणार आहे. यामुळे मच्छीमारांनी दक्षिण कोकण, गोव्याच्या किनारपट्टीवर जाऊ नये, असे हवामान विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.