Wed, Jan 16, 2019 13:41होमपेज › Konkan › सोमेश्‍वरमध्‍ये फासकीत अडकलेल्‍या बिबट्‍याला जीवदान 

सोमेश्‍वरमध्‍ये फासकीत अडकलेल्‍या बिबट्‍याला जीवदान (vidio )

Published On: Jun 24 2018 3:07PM | Last Updated: Jun 24 2018 3:07PM
गिमवी (गुहागर) :  प्रतिनिधी  

  रत्नागिरीत तालुक्यातील सोमेश्वर गावात फासकीत अडकलेल्या बिबट्याला आस सकाळी जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.    

सोमेश्वर गावातीलक शेलारवाडी नजीकच्या जंगलात एका ठिकाणी फासकित बिबट्या अडकला होता. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या रात्रीच्या सुमारास हा बिबट्या अडकला होता. पहाटे गावकर्‍यांच्‍या हि बाब लक्षात आली, त्यानंतर वनविभागाला याची कल्पना देण्यात आली. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. आणि बिबट्याने जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु झाले. जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागला यश आले.

वनाधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली या  बिबट्याला जेरबंद करण्यात आले.  यावेळी एल. बी. गुरव, कीर, सुरेश उपरे, नऊ गावडे यांनी बिबट्याला जेरबंद केले.