Wed, Jan 29, 2020 22:42होमपेज › Konkan › धाऊलवल्‍ली खाडीत राजरोस वाळू उत्खनन

धाऊलवल्‍ली खाडीत राजरोस वाळू उत्खनन

Published On: Mar 21 2018 10:51PM | Last Updated: Mar 21 2018 10:49PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यासाठी वाळू उत्खननाचे परवाने वितरित झालेले नसताना तालुक्याच्या काही भागात बिनधास्तपणे वाळू उत्खनन करून त्याची खुलेआम वाहतूक केली जात असल्याने महसूल विभागाच्या कारभारावर चिंता व्यक्‍त होत आहे. गोवळनंतर आता धाऊलवल्‍ली येथील खाडीत वाळूचे राजरोस उत्खनन करून त्याचा साठा केला जात असल्याने संबंधित मंडल अधिकारी, तलाठी यांचे उत्तरदायित्व संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

अनेक महिने महसूलच्या नाकावर टिचून उत्खनन केलेल्या वाळूची दररोज वाहतूक होत असल्याची चर्चा होत होती. आता मात्र यामागे प्रांत कार्यालयासह  महसुली अधिकारीच  शासनाला चुना लावत असल्याचे बोलले जात आहे. राजापूर तालुक्यात गेले काही महिने वाळूच्या उपशासाठी परवाने देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक परजिल्ह्यातून वाळूची आयात करीत आहेत.