Thu, Jul 18, 2019 10:38होमपेज › Konkan › दापोलीत ३१ गावे, ५४ वाड्या तहानलेल्या

दापोलीत ३१ गावे, ५४ वाड्या तहानलेल्या

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:40PMदापोल : प्रवीण शिंदे

2017-18 या वर्षीच्या पाणीटंचाई आराखड्यामध्ये  दापोली तालुक्यातील 31 गावांमधील 54 वाड्यांना पाणी टंचाईची झळ पोहोचणार आहे. यावर्षीच्या टंचाई आरखड्यामध्ये या गावांचा आणि वाड्यांचा समावेश आहे.

तालुक्यासाठी गतवर्षी 17 लाखांचा टंचाई आराखडा करण्यात आला होता तर गतवर्षी 41 गावे आणि 63 वाड्या यांचा टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये समावेश होता. यातील 12 गावांनाच गरजेनुसार पाणीपुरवठा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, 1 लाख 50 हजार इतकाच खर्च टंचाईग्रस्त गावांच्या पाण्यासाठी झाला. यावर्षी 2018 चा 15 लाखाचा टंचाईग्रस्त गावांच्या पाण्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. खेड आणि दापोली या दोन गावांच्या सीमेवर वसलेले देवाचा डोंगर या गावाला दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी 17 एप्रिल 2017 रोजी पहिला टँकर जामगेतील देवाचा डोंगर येथे धावला होता. मात्र, अद्याप तालुक्यातील कोणत्याही गावाकडून पंचायत समितीच्या पाणी विभागाकडे टँकरसाठी मागणी नोंदवली नसल्याचे येथील पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक राजेश 
लोवरे यांनी सांगितले. काही दिवसांपासून वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तालुक्यातील विहिरीतील पाणीसाठा घटण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, गतवर्षी पाऊस जरी चांगला पडला तरीही दरवर्षी दापोली तालुक्याला पाणी समस्येला सामारे जावेच लागते. तालुक्यातील ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे, अशा ग्रामपंचायतीचे सचिव यांनी पाणीटंचाई आराखड्यामध्ये आपल्या गावांची नावे नोंद केली आहे. 

यंदाच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील जामगे (देवाचा डोंगर), फरारे (मोगरेवाडी, मोेहल्‍ला), आघारी (तिवरे रहाटवाडी), वावघर (बौद्धवाडी, वलेकरवाडी, मोहल्‍ला), उन्हवरे (जाधववाडी, मुजावरवाडी, गणेशवाडी, पालांडेवाडी, भोइवाडी), आतगाव (गावठाण, भाटवाडी), उंबरशेत (सभाजीनगर, नवीमोहल्‍ला), उटंबर (कोळीवाडा,  चिंचवळ, डायरा), पाजपंढरी (पाजपंढरी गाव), ओणी (धारवाडी, भोईवाडी, पूर्व व पश्‍चिमवाडी), भाटी (पूर्व व पश्‍चिमवाडी, भोईवाडी), ओणनवसे (बौद्धवाडी, ममतुलेवाडी), नवसे (नवसे), उंबर्ले (गावाकरीता), गुघडे (गावाकरीता),  उंबरघर (गावाकरीता), करजगाव (लिंगावलेवाडी), तामसतीर्थ (कोळीवाडा), जालगाव गावाकरिता, गव्हे  (शिवशक्‍ती  वसाहत,   पवारवाडी), गावराइ (कळकवाडी), उसगाव (गाव), वत पंचनदी (भिवंदर), आसूद (काजरेवाडी, आसुद पूल, बौद्धवाडी, मोहल्‍ला), गिम्हवणे (चमैकारवाडी, सोनारवाडी, तेलीवाडी, बौद्धवाडी) पोफळवणे (गाव), वाघवे (गावठाण), मुरुड (गाव), किन्हळ (गाव), केळशी (मुस्लीम मोहल्‍ला, कुंभारवाडा)  या गावांचा 2017-18 या वर्षीच्या पाणी आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.