Sat, May 30, 2020 05:13होमपेज › Konkan › कोकण किनारपट्टीवर ‘हाय अ‍ॅलर्ट’

कोकण किनारपट्टीवर ‘हाय अ‍ॅलर्ट’

Published On: Jan 16 2018 2:11AM | Last Updated: Jan 15 2018 9:20PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी  अतिरेक्यांच्या संभाव्य आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोकण किनारपट्टी भागात अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टी भागात सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने सतर्कता बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांना करण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

कोकणात लाभलेल्या 720 कि.मी. किनारपट्टी भागात घुसघोरी करण्याच्या द‍ृष्टीने अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत. अतिरकी हल्ल्यात किनारपट्टीचा वापर या आधीही करण्यात आला होता. गतवर्षीही रायगड जिल्ह्यात तीन अतिरेकी घुसल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. 26/11च्या मुंबई हल्ल्यातही अतिरेक्यांनी किनारपट्टी भागाचा वापर  केल्याचे स्पष्ट  झाले  होते.  रायगडमधील दिघी बंदरात ‘आरडीएक्स’सारखी स्फोटके उतरविल्याचे पुढे आले होते. दिल्लीत होणार्‍या  प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यावर आत्मघाती हल्ल्याचे सावट आहे.