Thu, Jan 24, 2019 18:37होमपेज › Konkan › हुमरमळा येथे अपघात; पादचार्‍याचा मृत्यू

हुमरमळा येथे अपघात; पादचार्‍याचा मृत्यू

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:21PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी :

मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा-डोंगरेवाडी येथे बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ओरोस येथील अशोक केशव वारंग (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. ओरोस मुख्यालयात काम करणारे पत्रकार मनोज वारंग यांचे ते वडील होत. अशोक वारंग हे बुधवारी हुमरमळा-डोंगरेवाडी येथे रात्री 10.30 वा. च्या सुमारास महामार्गावरून पायी चालत येत असताना त्यांना कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जाणार्‍या अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित वाहन वारंग यांच्या अंगावरून गेल्याने हा मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. मृतदेहाची ओळख गुरुवारी सकाळी  11.30 वा. च्या सुमारास पटली. अज्ञात वाहनचालकावर ओरोस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. एस. देसाई हे करत आहेत. अपघाताची खबर समजताच सहायक पोलिस निरीक्षक मारुती जगताप व पोलिसांनी पंचनामा केला. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. अपघाताची खबर प्रसाद पाताडे यांनी पोलिसांना दिली होती.