होमपेज › Konkan › पर्यटन कर वसुलीस विरोध करणार्‍यांवर कारवाईची मागणी

तारकर्ली सरपंचांचे जि.प.समोर उपोषण

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:48PMओरोस : प्रतिनिधी

पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अभ्यागतांवर प्रतिव्यक्‍ती कर वसुली आदेशाचा अवमान करणार्‍यांवर  कडक कारवाई करुन वसुली लावावी या मागणीसाठी तारकर्ली सरपंच जितेंद्र केरकर यांनी जि. प. समोर उपोषण केले. 

मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर येथील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अभ्यागतांवर प्रतिव्यक्‍ती करवसुली आदेशाचा अवमान केल्याबाबत श्री. केरकर यांनी वेळोवेळी उपोषणे केले.देवबाग माजी सरपंच उल्हास तांडेल व तत्कालीन ग्रामसेवक युवराज चव्हाण यांच्या कालावधीमध्ये सन 2017 साली तारकर्ली देवबाग जि.प.रस्त्यावर अनधिकृत विनापरवाना लाठी उभारून अभ्यांगत करवसुली सुरू केली होती. देवबाग ग्रा. पं. ला सुनामी आयलंड बेटावर कर वसुली स्थळाची निश्‍चिती असताना सदर रस्त्यावर कर वसुली कुठल्या शासन निर्णयाने करण्यात आली याचा खुलासा करुन चुकीच्या गोष्टींवर कायदेशीर कारवाई का झाली नाही. 

2017-18 पर्यंत येणार्‍या पर्यटकांकडून कर वसुली केली जात नाही. याबाबत शासनाचा अवमान करणार्‍या ग्रा. पं. तसेच ग्रामसेवक यांना सेवेतून मुक्‍त करावे,कर वसुलीकरिता उभारण्यात आलेल्या अनधिकृत लाठी,करवसुली केबीन तसेच शुभारंभ कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात यावा, माजी सरपंच यांना ग्रा. पं. देवबाग मधील अपहारप्रकरणी निलंबीत करण्यात आले मग आजवर फौजदारी अथवा अपहाराच्या रक्कमेची वसुली का झाली नाही? याबाबत खुलासा व्हावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याप्रश्‍नी आपणांला जि. प. प्रशासनाकडून  न्याय न मिळाल्यास आपण जि. प. समोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा जितेंद्र केरकर यांनी दिला आहे.