होमपेज › Konkan › खेमराज मेमोरियलची प्रणिता राऊळ सावंतवाडी तालुक्यात प्रथम

खेमराज मेमोरियलची प्रणिता राऊळ सावंतवाडी तालुक्यात प्रथम

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 31 2018 12:42AMसावंतवाडी : शहर वार्ताहर

सावंतवाडी तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल 96.63 टक्के लागला आहे.तालुक्यातील विविध महाविद्यालयातून एकूण 2168 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 2095 विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले.खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल अ‍ॅड ज्युनिअर कॉलेजची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्रणिता रवींद्रनाथ राऊळ हिने 94.15 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तनया रामचंद्र वाडकर हिने 93.7 टक्के गुणांसह द्वितीय तर आरपीडीच्या कोमल संजय नाईक 90.15 टक्के गुण प्राप्त करत तृतीय आली.

येथील आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल यंदाही 100 टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राहिली आहे.या प्रशालेचे परीक्षेस प्रविष्ट सर्व 226 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पंचम खेमराजचा 96.53 टक्के निकाल
पंचम खेमराज महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 96.53 टक्के लागला असून परीक्षेस प्रविष्ट 346 पैकी 334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विज्ञान शाखेचा निकाल 99.44 टक्के लागला असून 179 पैकी 178 विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले.या शाखेची विद्यार्थिनी तनया रामचंद्र वाडकर हिने 93.7 टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला.शुभम श्रीधर धारगळकर याने 90 टक्के गुणांसह प्रशालेत द्वितीय तर युवराज संतोष देसाई व अजय शिवकुमार सावंत यांनी 87.84 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेचा निकाल 99.01 टक्के लागला असून 102 पैकी 101 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.उझ्मा रफिक बेग हिने 83.38 टक्के गुणांसह प्रथम,भूषणकुमार सोमनाथ गावडे 80.46 टक्के गुणांसह द्वितीय तर हलिमा निजामुद्दीन हिने 79.53 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.कला शाखेचा निकाल 87.09 टक्के लागला असून परीक्षेत प्रविष्ट 62 पैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.हृषिकेश गोविंद परब याने 74.76 टक्के गुणांसह प्रथम,कीर्ती विजय उपाध्याय 72.46 टक्के गुणांसह द्वितीय तर कीर्ती संदेश शंकरदास हिने 72.30 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

आरपीडी कॉलेजचा 98.60 टक्के निकाल
येथील आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल 98.60 टक्के लागला असून परीक्षेस प्रविष्ट 862 पैकी 850 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे.विज्ञान शाखेतून चिन्मय भूषण दाभोलकर याने 89.38 गुणांसह प्रथम, मनाली शामराव माने 89.23 गुणांसह द्वितीय तर सवांद प्रविण बांदेकर याने 85.69 गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेचा निकाल 99.51 टक्के लागला असून 411 पैकी 409 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोमल संजय नाईक हिने 90.15 टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम व तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला.युतीका मिलिंद विर्नोडकर हिने 89.69 टक्के गुणांसह द्वितीय तर हर्षदा भालचंद्र पुळासकर हिने 86.77 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.कला शाखेचा निकाल 95.76 परीक्षेस प्रविष्ट 189 विद्यार्थ्यांपैकी 181 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रतीक्षा कृष्णा कदम हिने 86.62 टक्के गुणांसह प्रथम,प्रतिक्षा रतेश कांबळे हिने 82.62 टक्के गुणांसह द्वितीय तर सुशांत सुरेश राऊळ याने 79.07 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व रोशन विठ्ठल परब 73.07 टक्के गुणांसह प्रथम,कविता अनंत नाईक हिने 72.30 टक्के गुणांसह द्वितीय तर आकाश अरुण म्हालटकर याने 71.53 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कन्स्ट्रक्शन शाखेचा निकाल 90.90 टक्के लागला असून,कृष्णा चंद्रकांत म्हापसेकर प्रथम,स्वाती शांताराम परब व्दितीय तर प्रथमेश परशुराम काकतकर याने तृतीय क्रमांक मिळविला.

कळसुलकरचा 87.03 टक्के निकाल
कळसुलकर इंग्लिश स्कूलचा निकाल 87.03 टक्के लागला असून परीक्षेस प्रविष्ट 54 पैकी 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कला शाखेचा निकाल 88.23 टक्के लागला असून,34 पैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.चैताली गुरुनाथ जाधव हिने 76.15 टक्के गुणांसह प्रथम,अंकिता सदानंद मुंडये हिने 74.31 गुणांसह द्वितीय तर सोनाली अनंत नाईक 73.07 गुणांसह तृतीय आली.वाणिज्य शाखेचा निकाल 85 टक्के लागला असून उत्कर्षा राजन नावर हिने 67.54 टक्के गुणांसह प्रथम,कार्तिकी कृष्णा नाईक हिने 64.46 टक्के गुणांसह द्वितीय तर करिष्मा पृथ्वीराज धुरी हिने 62.77 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल 97.77 लागला असून परीक्षेस प्रविष्ट 404 पैकी 395 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या प्रशालेच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून या शाखेची विद्यार्थिनी प्रणिता रवींद्रनाथ राऊळ हिने 94.15 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.मानसी दिपक सावंत हिने 87.07 टक्के गुणांसह द्वितीय तर शिवानी प्रमोद कामत हिने 82.75 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व 188 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सिद्धी प्रकाश म्हापसेकर हिने 82 टक्के गुणांसह प्रथम प्रज्योल पांडुरंग नाईक याने 80.61 टक्के गुणांसह द्वितीय तर उषा विश्राम पोखरे हिने 80.30 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.कला शाखेचा निकाल 92.80 टक्के लागला असून,125 पैकी 116 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.वर्षा सखाराम धुरी हिने 80.30 टक्के गुणांसह प्रथम,रत्नप्रभा भरत राऊळ हिने 79.07 गुणांसह द्वितीय तर आदिती आत्माराम गावडे हिने 78.61 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

नेमळे विद्यालयाचा 93.75 टक्के निकाल
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 93.75 टक्के लागला असून 64 पैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कला शाखेचा निकाल 78.96 टक्के लागला असून 19 पैकी 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.पूजा महादेव कुंभार हिने 69.23 टक्के गुणांसह प्रथम,अक्षता बाबुराव राऊळ हिने 68.76 टक्के गुणांसह द्वितीय तर पूजा भागोजी डोईफोडे हिने 65.38 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.पूजा महादेव नाईक हिने 82.92 टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला.तेजस्वी राजन कुबल हिने 79.69 टक्के गुणांसह द्वितीय तर कांशीराम बाळकृष्ण गावडे 73.53 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

सांगेली महाविद्यालयाचा 96.20 टक्के निकाल
सांगेली येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 96.20 टक्के लागला असून 158 पैकी 152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.वाणिज्य शाखेचा निकाल 97.10 टक्के लागला असुन 69 पैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.पूजा रमेश मेस्त्री हिने 78.31 टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम,पल्लवी बाबुराव सावंत 74.15 टक्के गुणांसह द्वितीय तर सत्यम संतोष राऊळ याने 73.69 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.कला शाखेचा निकाल 90 टक्के लागला असुन सुभेष सुरेश वंजीवले याने 71.79 टक्के गुणांसह प्रथम , मिलन विठ्ठल खरात हिने 66.61 टक्के गुणांसह द्वितीय तर आदित्य सखाराम गावडे याने 64.77 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.महादेव अनिल सावंत(69.69),उषा अनिल सावंत(69.53),स्नेहा राजेश घाडी(67.23) गुणांसह अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

तळवडे महाविद्यालयाचा 84.45 टक्के निकाल
तळवडे जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 84.45 टक्के लागला असून 45 पैकी 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेच्या विद्या विलास बावकर,भक्ती न्यानेश्‍वर नागवेकर,पुनम पंढरीनाथ रेडकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

आंबोली सैनिक स्कूलचा 100टक्के निकाल
आंबोली येथील सैनिकी स्कूलने 100 टक्के यशाची परंपरा कायम ठेवली असून,सर्व 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या प्रशालेतून शुभम विठ्ठल बांदेकर याने 82.76 टक्के गुणांसह प्रथम,गंधार ज्ञानदेव तेली याने 75.69 टक्के गुणांसह द्वितीय तर प्रथमेश राजन गावडे याने 71.53 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.